Agriculture news in Marathi Administer administrative service according to the law guarantee | Agrowon

प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार करा : पालकमंत्री बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी, विकासकामांसाठी लागणारा कालावधी व निधी विहित वेळेत खर्च करण्यात होणाऱ्या दिरंगाईबद्दल यंत्रणेतील जबाबदार घटकांवर कारवाई होणे आवश्यक असून, ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी सेवा हमी कायद्यानुसार प्रशासकीय कामकाज करावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी, विकासकामांसाठी लागणारा कालावधी व निधी विहित वेळेत खर्च करण्यात होणाऱ्या दिरंगाईबद्दल यंत्रणेतील जबाबदार घटकांवर कारवाई होणे आवश्यक असून, ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी सेवा हमी कायद्यानुसार प्रशासकीय कामकाज करावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

या वेळी महापौर अर्चना मसने, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख आदी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

या वेळी बच्चू कडू यांनी प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला. प्रशासनास पीकविमा योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, तसेच अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावयाचा मोबदला याबाबत लाभ वितरणाची सद्यःस्थिती जाणून घेतली. याबाबत प्रशासनाने वेळीच लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला मदत होणे आवश्यक असून, त्यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असे त्यांनी बजावले.

प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी सेवा हमी कायदा तयार करण्यात आला असून, या कायद्याची अंमलबजावणी केल्यास दिरंगाईस वा बेजबाबदारपणा बद्दल जबाबदारी निश्चित करता येते. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यान्वये करावे.
- बच्चू कडू, पालकमंत्री


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...