agriculture news in marathi Administration and crop insurance company clashes on Crop Damage record procedure | Page 2 ||| Agrowon

उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून प्रशासन-कंपनीत जुंपली

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून आव्हान-प्रतिआव्हान दिले जात असल्याने भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. 

उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून आव्हान-प्रतिआव्हान दिले जात असल्याने भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. २०२० मध्ये केंद्र सरकारकडून काढलेल्या एका आदेशाचा आधार घेऊन कंपन्यांनी भरपाई देण्यासाठी चलाखी सुरू आहे का, हा प्रश्‍न आहे. पीक कापणी प्रयोगातील उत्पन्नाची सरासरी व नुकसानीचे प्रमाण याचा संबंध जोडून त्यानुसार भरपाई देण्याचा निकष केंद्राचा आहे, पण त्याला जिल्हा प्रशासनाकडून आव्हान देण्यात आले आहे.

पीकविम्याच्या बाबतीत कंपन्यांना जो निकष फायद्याचा दिसतो त्यावरून ती प्रक्रिया राबविण्याचा विचार करतात. त्याचा प्रत्यय गेल्या वर्षीही जिल्ह्यात नुकसान होऊनही विम्यापोटी मिळणारी भरपाई देण्यास कंपन्यांनी टाळाटाळ केली. अगदी या वर्षीसुद्धा गेल्या वर्षी जे निकष कंपन्यांनी गृहीत धरले होते. त्याची पूर्तता या वेळी शेतकऱ्यांनी केली. मात्र यंदा त्यांनी वेगळा निकष समोर आणला असून, गेल्याच वर्षी केंद्राकडून काढलेल्या एका नोटिफिकेशनचा आधार त्यांनी घेतल्याचे ते सांगत आहेत. राज्याच्या निकषांमध्ये जिल्ह्याचा विचार करता सोयाबीनचा काढणीचा काळ हा १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर असा आहे.

केंद्राच्या निकषांचा आधार घेऊन कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगातील उत्पन्नाचाही वाटा गृहीत धरण्यात आला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई पन्नास टक्क्यांवर येते. अशाप्रकारे सोयीची भूमिका घेऊन कंपन्या शेतकऱ्यांचे नुकसान करताना दिसत आहे, केंद्राच्या अनेक चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे. ज्या भागामध्ये ८० टक्के नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी केंद्राच्या निकषांचा विचार केल्यास तिथे ४० टक्केच नुकसानभरपाई मिळू शकते. मात्र या निकषांचा अवलंब जिल्ह्याच्या बाबतीत करता येणार नसल्याचे मत जिल्हा प्रशासनाने कंपनीला कळविले आहे. त्यामुळे दोन्ही घटकांमध्ये यावरुन आव्हान प्रतिआव्हान देण्यात येत आहे.

जिल्ह्यासाठी साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम पीकविम्यापोटी मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच मंडलांतील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून, उस्मानाबाद तालुक्याला सर्वाधिक विमा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसानीची उस्मानाबाद तालुक्यात झाली असून, या ठिकाणी सरासरी ८० टक्के एवढे नुकसान नोंदविण्यात आले आहे. साहजिकच त्यानुसार भरपाईदेखील मिळणार आहे.

प्रतिक्रिया..
पीकविमा कंपनीने केंद्राने २०२० रोजी काढलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे मदतीपासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र प्रशासन म्हणून आम्ही त्याला विरोध केला असून यामध्ये पीक कापणी प्रयोगाचा सबंध जोडणे चुकीचे असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
- महेश तीर्थकर,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...