कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्
ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन चार छावण्या मंजूर
नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांची चारा पाण्याची सोय व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चारा छावण्यांची मागणी होती. अखेर प्राप्त प्रस्तावांवर विचार करून जिल्हा प्रशासनाने नवीन चार छावण्या मंजूर केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील छावण्यांची संख्या आता सहावर जाऊन पोचली आहे.
मंजूर झालेल्या या चारा छावण्या या आठवड्यात सुरू होतील, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. नांदगाव, मालेगाव आणि येवल्यात या छावण्या सुरू होणार आहेत. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भीषण असून, पाणी आणि चाराटंचाईच्या समस्येवर संघर्ष करावा लागत आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यातील गुळवंच व आडवाडीत छावणी सुरू झाली आहे. तर खापराळे येथे अगोदरच मंजूर आहे. आता या नव्या चार छावण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. मंजूर छावण्यांमध्ये येवला तालुक्यात अंगुलगाव येथील सद्गुरू जनार्दन स्वामी बहुउद्देशीय संस्था व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची अंदरसूलच्या छावणीचा समावेश आहे.
याशिवाय नांदगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ, शिवाजीनगर तसेच सिन्नर तालुक्यातील पांढुर्लीच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या छावणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यासह नांदगाव तालुक्यात चांदोरा येथील अण्णासाहेब जाधव बहुउद्देशीय संस्था आणि जळगाव बुद्रुक येथील एकता कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक मंडळाने देखील छावणीचा प्रस्ताव दिला असून, तो देखील लवकरच मंजूर करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे.
अनामत रकमेत बदल
जिल्हा प्रशासनाकडून छावण्या सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील विविध संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या छावणी सुरू करणाऱ्या संस्थेच्या अथवा व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये १० लाख रुपये रक्कम अनामत पोटी असावी, असा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हा प्रशासनाने १० लाखांची अट शिथिल केल्याने संस्था आणि व्यक्तींना दिलासा मिळाला असून, ही रक्कम आता ५ लाखांवर आली आहे.
- 1 of 578
- ››