agriculture news in Marathi, Administration have watch on Onion transactions, Maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात कांदा व्यवहारांवर प्रशासनाचा 'वॉच'
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यानंतर कार्यालयाकडून कामकाज सुरू आहे. यामध्ये बाजार समितीत होणारी कांदा खरेदी-विक्री याची माहिती घेण्यात येत आहे. संकलित केलेल्या माहितीचा आढावा घेऊन वॉच ठेवण्यात येत आहे. बाजारातील ट्रेंड काय सुरू आहे ? याकडे आमचे बारीक लक्ष असणार आहे.
- गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, नाशिक

नाशिक  : जिल्ह्यातील कांदा खरेदी-विक्रीच्या कामकाजावर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. त्यानुसार बाजार समित्यांमध्ये होणारे कांद्याचे लिलाव, व्यपाऱ्यांकडून होणारे दैनंदिन कामकाजावर 'वॉच' ठेवला जात आहे.

दरम्यान, कांदा आवकेत काही अंशी वाढ झाली असली, तरी सर्वसाधारण आवकेच्या तुलनेत ती मंदावलेली होती. दरात मात्र घसरण दिसून आली.
कांदा साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात नऊ दिवसांपूर्वी (ता. २) सुरू झाली. या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी पणन संचालनालय व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा साठवणुकीवर निर्बंध सुरू झाले. त्यानुसार बाजार समितीमध्ये परवानाधारक कांदा व्यापाऱ्याचा होणारा दैनंदिन व्यवहार यावर तालुका सहायक निबंधक व संबंधित बाजार समिती प्रशासन कामकाजावर लक्ष ठेऊन आहे.

बाजार समितीमध्ये दैनंदिन होणारी कांदा आवक, पुरवठा व शिल्लक साठ्याची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाप्रमाणे होणाऱ्या कामकाजाचा आढावा संबंधित बाजार समिती प्रशासन सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दररोज सादर करत आहेत. 

कांद्याचे व्यवहार बाजार समितीत पार पडल्यानंतर दररोज होणारी कांदा आवक, पुरवठा व शिल्लक साठ्याची तपासणी संबंधित बाजार समित्यांचे सचिव व बाजार समितीचे प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांच्या खळ्यातील साठवलेल्या मालाची तसेच हाताळणी व प्रतवारी झाल्यानंतर पाठविण्यात येणाऱ्या मालाची प्रत्यक्ष पाहणी करून नोंदी घेण्यात येत आहेत. त्यानंतर संपूर्ण आढावा विहित नमुन्यात पाठविण्यात येत आहे. कामात कोणतेही दिरंगाई होणार नाही याबाबत सक्त ताकीद बाजार समितीच्या प्रशासनाला देण्यात आल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दररोज बाजार समितीमधील घडामोडी प्राप्त होत आहेत.

अशी आहे दैनंदिन आढावा घेण्याची पद्धत
केंद्राने घेतलेल्या साठवणुकीच्या निर्णयाबाबत पणन संचालनालयाने बाजार समितीला दररोज झालेल्या व्यवहाराची नोंद करीत व्यापाऱ्यांकडील दैनंदिन कांदा शिलकेबाबत एकत्रित माहितीचा गोषवारा पाठवणे बंधनकारक केला आहे. त्यामुळे दैनंदिन पाठविण्यात येणाऱ्या आढाव्यामध्ये परवानाधारक कांदा व्यापाऱ्यांचे नाव, त्याच्या फर्मचे नाव, त्याच्याकडे असलेली आरंभी शिल्लक, अहवाल ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशीची व्यापाऱ्याने केलेली कांदा खरेदी, अखेरची निर्गती, व्यापाऱ्याकडे अखेर शिल्लक व जर कांदा शिल्लक असेल तर त्यांची कारणे या आदेशान्वये देणे बंधनकारक असल्याने व्यापारीसुद्धा काटेकोरपणे कामकाज करताना दिसून येत आहे. जिल्हा उपनिबंधक यांना बाजार समितिनिहाय आढावा प्राप्त झाल्यानंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...