agriculture news in marathi Administration in Khandesh crop loan issue indifferent | Agrowon

खानदेशात प्रशासन पीककर्जाप्रश्नी उदासीन

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

जळगाव ः  खानदेशात पीक कर्ज वाटप संथ गतीने सुरू आहे. सुमारे ६० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. ही गती वाढत नसल्याचे दिसत असले, तरी देखील प्रशासन याबाबत बैठका, बँकांना सूचना देण्याची कार्यवाही करीत नसल्याचे चित्र आहे. 

जळगाव ः  खानदेशात पीक कर्ज वाटप संथ गतीने सुरू आहे. सुमारे ६० टक्के वाटप पूर्ण झाले आहे. ही गती वाढत नसल्याचे दिसत असले, तरी देखील प्रशासन याबाबत बैठका, बँकांना सूचना देण्याची कार्यवाही करीत नसल्याचे चित्र आहे. 

जळगाव जिल्ह्यात पारोळा क्षेत्राचे आमदार चिमणराव पाटील यांनी राष्ट्रीयीकृत बँका चुकीचे कारणे सांगून पीक कर्जास नकार देत असल्याचे पत्र राज्य शासन, केंद्राला दिले आहे. अशीच नाराजी इतर लोकप्रतिनिधींमध्ये आहे. परंतु प्रशासन कोविड व इतर मुद्यांमध्येच गुंतलेले आहे. पीक कर्जप्रश्नावर दर महिन्याला आढावा बैठक प्रशासनाने घेणे अपेक्षित आहे. पण अशा बैठका जळगाव जिल्ह्यात दोनदाच झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी धुळे, जळगावात अशा बैठका घेतलेल्या नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी व धुळे - नंदुरबारात मिळून सुमारे ११०० कोटी रुपये पीक कर्जवाटप अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा बँकेने लक्ष्यांक गाठला आहे. धुळ्यातही धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची कामगिरी चांगली आहे. पण राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना १०-१२ चकरा मारल्याशिवाय पीक कर्ज देत नसल्याचा आरोप केला जात आहे. 

मध्यंतरी शिंदखेडा (जि.धुळे) क्षेत्राचे आमदार जयकुमार रावल यांनी देखील बँकांच्या भूमिकेबाबत काही सूचना केल्या होत्या. सर्च रिपोर्टचे दर, सातबऱ्यावरील नोंदी, पीक कर्ज नूतनीकरणासही केला जाणारा विलंब आदी कारणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. बँका ऑनलाइन सातबारा व नोंदी ग्राह्य धरीत नाहीत. यामुळे कागदपत्रांसाठी तलाठी, तहसील कार्यालय, नंतर सर्च रिपोर्टसाठी वकिलांकडे जावे लागते. नवे कर्ज प्रस्ताव अनेक बँकांनी मंजूर केलेले नाहीत.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...