Agriculture news in marathi Administration's confusion in the planning of vegetable sales in Solapur | Agrowon

सोलापुरात भाजीविक्रीच्या नियोजनात प्रशासनाचा गोंधळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

सोलापूर : ‘कोरोना’मुळे बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. त्यामुळे महसूल आणि महापालिका प्रशासनाने शहरात सहा ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती भाजी मंडई सुरु करण्यास परवानगी दिली. पण, शहराचे सर्व रस्ते बंद केल्याने आणि पोलिसही सरसकट पासची मागणी करत असल्याने अगदी मोजकेच शेतकरी तिथपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे शहरात फळभाज्या आणि भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. ठरवलेल्या या ठिकाणच्या नियोजनामध्ये प्रशासन पुरते गोंधळल्याचे चित्र आहे. 

सोलापूर : ‘कोरोना’मुळे बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. त्यामुळे महसूल आणि महापालिका प्रशासनाने शहरात सहा ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तात्पुरती भाजी मंडई सुरु करण्यास परवानगी दिली. पण, शहराचे सर्व रस्ते बंद केल्याने आणि पोलिसही सरसकट पासची मागणी करत असल्याने अगदी मोजकेच शेतकरी तिथपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे शहरात फळभाज्या आणि भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. ठरवलेल्या या ठिकाणच्या नियोजनामध्ये प्रशासन पुरते गोंधळल्याचे चित्र आहे. 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील १० हुन अधिक ठिकाणे सील केली आहेत. त्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून शहरात संपूर्णपणे संचारबंदी लागू केली आहे. केवळ सकाळचे दोन तास दूध आणि भाजीपाला यासाठी वेळ देण्यात आला आहे. शहरातील होम मैदान, कर्णिक नगर, केशवनगर या ठरवून दिलेल्या ठिकाणी शहरातील ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी तुटून पडत आहेत. त्यात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याची स्थिती आहे. 

शहरानजीकच्या ठिकाणाहून भाजीपाला घेऊन शहरात जायला आणि ठरलेल्या ठिकाणी पोहचायला किमान तासभर लागतो. पण, तोपर्यंत दिलेली वेळ संपते. शिवाय नाक्या-नाक्यावर पोलिस बंदोबस्त असल्याने शेतकऱ्यांना हात जोडून विनवणी करून आत प्रवेश करावा लागतो. ही सगळी कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शिवाय वेळेमुळे बसून विक्री करण्याला मर्यादा येतात. साहजिकच, किरकोळ विक्रेत्याला मिळेल, त्या भावात भाजी विक्री करून लगेच ते माघारी परतत आहेत. नेमका याचाच गैरफायदा शहरातील किरकोळ विक्रेते घेत आहेत. अव्वाच्या सव्वा दरात पुढे त्याची विक्री करत आहेत. 

समन्वयाचा अभाव 

‘कोरोना’मुळे सध्या महसूल विभागाचे प्राधान्य त्याच्या नियंत्रणाकडे आहे. त्यामुळे अन्य विषयाला दुय्यम स्थान आहे. पण, भाजीपाला आणि दूध यासारख्या प्राधान्याच्या आणि अत्यावश्यक सेवेतील वस्तू असूनही प्रशासनाला त्याचे नेमके नियोजन करता येऊ शकत नाही. महसूल, कृषी आणि बाजार समिती यांच्यात समन्वय नसल्याचेच हे चित्र आहे. शेतकऱ्यांना शहरात भाजीविक्रीसाठी पास देण्याबाबत पोलिस चालढकल करत आहेतच. पण, आता कृषी विभागाकडून पास देण्याची सूचना असूनही, त्याबाबतही काहीच हालचाली नाहीत. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...