प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.    एकूण मतदार

  • राज्यातील एकूण मतदार ः ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६००.
  • पुरुष मतदार ः ४ कोटी  ६८ लाख ७५ हजार ७५०.
  • महिला मतदार ः ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५.
  • तृतीयपंथी मतदार ः २ हजार ६३४. 
  • दिव्यांग मतदार ः ३ लाख ९६ हजार.
  • सर्व्हिस मतदार ः १ लाख १७ हजार ५८१.
  • यंत्रणा सज्ज

  • विधानसभा निवडणुकीसाठी १ लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), १ लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचादेखील समावेश आहे.
  • विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६.५० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
  • मतदारांच्या सुविधेसाठी

  •  आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध.
  •  ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिता जीपीएस ट्रॅकिंग ॲप उपलब्ध.
  • ‘व्होटर हेल्पलाइन-१९५० या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
  • मतदारांसाठी व्होटर हेल्पलाइन ॲप सुरू.
  • दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी पीडब्ल्यूडी ॲपची सुविधा.
  • मतदान केंद्रे 

  • राज्यातील मतदान केंद्रे ः ९६ हजार ६६१.
  • मुख्य मतदान केंद्रे ः ९५, ४७३.
  • सहायक मतदान केंद्रे  ः ११८८.
  • महिलांसाठी ३५२ सखी मतदान केंद्रे स्थापन होणार.
  • मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.   मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

  • मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.
  • भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशा वेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
  • पासपोर्ट (पारपत्र)
  • वाहनचालक परवाना
  • छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र) 
  • छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
  • पॅन कार्ड 
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूलनिर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्ट कार्ड
  • मनरेगा जॉब कार्ड
  • कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  • छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज
  • खासदार/आमदार/ विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com