Agriculture news in marathi Administrative transfers of primary teachers canceled | Agrowon

प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

कुसुंबा, जि. धुळे ःकोरोनाच्या आपत्ती काळांत प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. केवळ विनंती बदल्या करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून प्राथमिक शिक्षकांकडे पाहिले जाते, त्यांची संख्या जास्त म्हणून बदल्यांचा प्रश्नही तेवढाच किचकट मानला जातो. यावर्षी देखील प्राथमिक शिक्षकांचा प्रश्न चर्चेचा ठरला आहे. कोरोनाच्या आपत्ती काळांत प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. केवळ विनंती बदल्या करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

हा आदेश येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. या बदल्या सुमारे १५ टक्‍केपर्यंत होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या गैरसोय होणार होती. शिवाय या बदल्या ऑफलाइन होणार असल्याने प्राथमिक शिक्षक संघाने टिकेची झोड उठवली होती. कोरोना महामारीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना जिल्‍हा परिषदेत बोलावणे देखील धोकादायक होते. 

प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला. शिक्षक हिताच्या बदल्यांबाबत आग्रही भूमिका घेतली. शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द व्हाव्यात, यासाठी राष्र्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या सूचनेनुसार चक्रे फिरली.

मुश्रीफ यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यासमवेत बैठक घेऊन शिक्षकांच्या बदली संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानुसार प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात आल्या. केवळ अपंगसंवर्ग, पती - पत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्रांतील कार्यरत शिक्षकांच्या विनंती बदल्या करण्याबाबतचा आदेश देण्यात आला. 

संघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्य अध्यक्ष बाळासाहेब तांबारे, उपाध्यक्ष संजय पोतदार, जिल्हाध्यक्ष गमन पाटील, सरचिटणीस शरद पाटील, जिल्हा नेते मनोहर शिंदे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. 
 


इतर ताज्या घडामोडी
फळबागेत आच्छादन, कीड नियंत्रण महत्वाचेनारळ पावसाची उघडीप आणि तापमानात वाढीदरम्यान...
नाशिक विभागात अतिवृष्टीमुळे ८३ हजार...नाशिक : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून...
पालखीमार्गाच्या भूसंपादनाबाबत...माळीनगर, जि. सोलापूर  : पालखीमार्गाच्या...
परतीचा मॉन्सून उद्या राजस्थान,...पुणे : परतीच्या मॉन्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी...
सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाचे आज ई...वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या...
राज्यात कांदा २०० ते ४३५२ रुपये सोलापुरात सरासरी २००० रुपये सोलापूर  ः...
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून...मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद...
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...