सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक

ऑगस्ट महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींवर अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
Administrator finally on 70 gram panchayats in Sindhudurg district
Administrator finally on 70 gram panchayats in Sindhudurg district

वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींवर अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे इच्छुक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायतींची मुदत ३ ऑगस्टला तर २ ग्रामपंचायतींची मुदत १२ ऑगस्टला संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका साधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत होत असत. परंतु यावर्षी निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला सरपंचपद आरक्षित असलेल्या प्रवर्गातील गावातील व्यक्तीची पालकमंत्र्याशी चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासक म्हणून नियुक्त करायचा निर्णय झाला होता. परंतु या निर्णयाला आक्षेप घेत उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, गावातीलच व्यक्तीची निवड होणार म्हणून राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी केली होती. ३ व ४ ऑगस्टला ६८ ग्रामपंचायतींची मुदत संपली तर १२ ऑगस्टला २ ग्रामपंचायतींची मुदत संपली.

कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेली पाच ते सहा दिवस प्रशासकपदी कोणाचीही नेमणूक केली नव्हती. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री.वसेकर यांनी ७० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. कृषी अधिकारी, जलसंधारण अधिकारी, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षिका या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी दोन दिवसांत कार्यभार स्वीकारायचा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com