Agriculture news in marathi Administrator finally on Kolhapur Market Committee | Agrowon

कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या येथील बाजार समितीवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी (ता. ५) दुपारी कोल्हापूर शहर उपनिबंधक प्रदीप मालगावे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या येथील बाजार समितीवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी (ता. ५) दुपारी कोल्हापूर शहर उपनिबंधक प्रदीप मालगावे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

सग्यासोयऱ्यांना नोकरी लावण्याच्या कारणावरून गेली काही दिवस बाजार समितीचे वातावरण तापले होते. काही संचालकांनी इतर संचालकांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल येण्या अगोदरच सोमवारी (ता. ४) १४ संचालकांनी तर मंगळवारी (ता. ५) सभापती उपसभापतीनी राजीनामे दिले. संचालकांची मुदत ही बुधवारी (ता. ५) संपत होती. या पार्श्वभूमीवर समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सध्या तरी इतर पर्यायांचा मार्ग बंद झाला आहे. 

शेती उत्पन्न बाजार समिती नोकर भरती तसेच जागा हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीरपणे झाल्याच्या तक्रारी शिवसेनेचे संचालक प्रतिनिधी ॲड. किरण पाटील, भाजपचे नाथाजी पाटील, भगवान काटे आदींनी जिल्हा निबंधकांकडे केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा निबंधकांनी तीन अधिकाऱ्यांच्या समितीतर्फे बाजार समितीची चौकशी सुरू केली आहे. 

या चौकशी समितीचा अहवाल तयार होत आहे. यात संचालक मंडळ बरखास्तीची शक्‍यता अधिक असल्याची बाब विचारात घेऊन बहुतांशी संचालकांनी जिल्हा निबंधकांकडे राजीनामे दिले. त्यापाठोपाठ उपसभापतीनी आपला राजीनामा सभापतींकडे दिला. सभापतींनी आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे दिला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...