कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम कौतुकास्पदः पुरुषोत्तम रुपाला

purushottam rupala
purushottam rupala

अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचा या भागात जो प्रयोग झाला तो कौतुकास्पद आहे. हे काम देशपातळीवर कसे नेता येईल, यासाठी सरकार स्तरावर प्रयत्न करू, असे आश्‍वासन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले.  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि यूपीएलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय अधिकारी, कीटकनाशक उत्पादक व शेतकरी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार गोवर्धन शर्मा, विजय अग्रवाल, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यूपीएलचे चेअरमन रज्जू श्रॉफ, उपाध्यक्षा सँड्रा श्रॉफ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, यूपीएलचे समीर टंडन, डॉ. अजित कुमार, कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, प्रकल्प समन्वयक प्रताप रणखांब आदी उपस्थित होते.   श्री. रुपाला पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गेल्या काळात घोषणा केली. यानुसार देशात उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढ आणि योग्य भाव मिळवून देणे या तीन पातळ्यांवर काम केले जात आहे. शेतकऱ्यांनी शेतीतील खर्च कमी केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती, नवतंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीच्या विविध प्रयोगासाठी लागणारी यंत्रे अनुदानित तत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करेल.  या कार्यक्रमात डॉ. भाले, जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त केले. ज्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केला त्यांनीही आपले अनुभव मंत्र्यांसमोर मांडले. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल डॉ. भाले, श्री. पापळकर, मोहन वाघ, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. अजित कुमार, डॉ. सी. पी. जायभाये, डॉ. दिनेश कानवडे, डॉ. कुळकर्णी, डॉ. नेमाडे यांच्यासह इतर शास्त्रज्ञांना सत्कार करण्यात आला. शेतकरी प्रश्‍नावर चर्चेची फॅशन भाषणाचा सुरुवातीलाच श्री. रुपाला यांनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर मैदानात जाऊन चर्चा करण्याची फॅशन आल्याचे सांगितले. परंतु प्रशासनाने, कंपनीने या पुढे जात शेतीत असलेल्या समस्यांवर उपाय योजल्या, हे काम शेतकऱ्यांसाठी मोठे आहे, असे म्हटले. यंत्रांना अनुदानासाठी प्रयत्न कीटकनाशक फवारणीसाठी यंत्राचा वापर वाढविणे फायदेशीर आहे. या यंत्राला भारत सरकारच्या माध्यमातून अनुदान कसे मिळवून देता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच कापसाचे अवशेष नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रालाही अनुदानाच्या कक्षेत आणण्यासाठी आपण दिल्लीत पाठपुरावा करू असे ते म्हणाले. खारपाण पट्ट्याचा स्वतंत्र अहवाल द्या; सुविधा देऊ अकोला जिल्ह्यातील शेती ही खारपाणपट्याची आहे. या सर्व शेतीचे माती आरोग्य पत्रिका तयार करा. सविस्तर एक अहवाल आपल्याकडे पाठवा, असे निर्देश श्री. रुपाला यांनी प्रशासनाला दिले. या भागातील ही शेती जिप्समच्या वापराने सुधारता येईल. खारपाण पट्ट्यासाठी जेवढे जिप्सम लागेल तेवढे देऊ. भारत सरकार काम करेल, असे आश्‍वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com