कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया रखडली

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अद्यापपर्यंत सुरू न झालेली निम्नस्तरीय कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. या बाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अधिष्ठातांना निवेदनही दिले आहे.
Admission process for agriculture diploma course stalled
Admission process for agriculture diploma course stalled

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अद्यापपर्यंत सुरू न झालेली निम्नस्तरीय कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. या बाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अधिष्ठातांना निवेदनही दिले आहे.  

या बाबत विद्यार्थी परिषदेने म्हटले, की महाराष्ट्रातील एकूण चार कृषी विद्यापीठांपैकी तीन विद्यापीठांत निम्मस्तरीय कृषी पदविका २०२०-२१ च्या प्रवेश प्रक्रिया चालू झाल्या किंवा संपल्या आहेत. परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अजून वेळापत्रक देखील जाहीर केले नाही. विदर्भातील कृषी पदविकेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने तातडीने प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात यावी. ४० कृषितंत्र निकेतन महाविद्यालयात सुमारे २४०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही केली.

यावेळी ॲग्रीव्हिजन विदर्भ प्रांत सहसंयोजक अनिकेत पजई, महानगर सहमंत्री देवाशिष गोतरकर, आदित्य केंदळे, जय आडे, महाविद्यालय प्रमुख प्रथमेश गणेशपुरे, संपर्क प्रमुख चंद्रकांत बोबडे, अकोला महानगर विस्तारक हर्ष रंजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवेश प्रक्रियेची फाइल पूर्ण झाली असून, मुंबईला पाठवत आहोत. आठवडाभरात याबाबतची रीतसर जाहिरात प्रसिद्ध होईल. कदाचित सोमवार (ता. १३) पासून ही प्रक्रिया सुरू होईल. - डॉ. महेंद्र नागदेवे, कृषी अधिष्ठाता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com