agriculture news in Marathi admission process of Bsc stuck Maharashtra | Agrowon

राज्यात बीएस्सी कृषीची प्रवेश प्रक्रिया अधांतरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश प्रक्रिया अधांतरी लटकली आहे. दरवर्षी सीईटीच्या माध्यमातून होणारे प्रवेश यंदा कसे केले जाणार, याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नसल्याने सर्वच जण प्रश्न उपस्थित करीत आहेत.

अकोला ः यंदा कोरोनामुळे बीएससी कृषी प्रवेश प्रक्रिया अधांतरी लटकली आहे. दरवर्षी सीईटीच्या माध्यमातून होणारे प्रवेश यंदा कसे केले जाणार, याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नसल्याने सर्वच जण प्रश्न उपस्थित करीत आहेत.

दरवर्षी बारावीच्या निकालानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया राबविली जाते. कृषी पदवीसाठी सीईटीच्या माध्यमातून प्रवेश दिले जात होते. यंदा कोरोना संक्रमणामुळे सर्व अभ्यासक्रम व प्रवेश ठप्प पडलेले आहेत. बारावीचा निकाल नुकताच लागला असून कृषी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडून सातत्याने विद्यापीठ तसेच कृषी महाविद्यालयांमध्ये चौकशी सुरु झालेली आहे.

राज्यात बीएसस्सी पदवीच्या १५ हजारावर जागा आहेत. बीएस्सी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, सामाजिक विज्ञान, बीटेक अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, जैव तंत्रज्ञान, बीएफएस्सी मत्स्यशास्त्र अशा अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. यात प्रामुख्याने बीएस्सी कृषीच्या सुमारे ९९०० पेक्षा अधिक जागा आहेत. यात सुमारे साडेबारा हजार जागा या खाजगी महाविद्यालयांमध्ये भरल्या जातात.

यंदा कोरोनामुळे सर्वच शैक्षणिक सत्र प्रभावित झालेले आहेत. याचा फटका आता बीएस्सीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनाही बसण्याची चिन्हे तयार झाली आहेत. यंदाचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातून केले जातील की, आणखी दुसरी काही प्रक्रिया राबवली जाते, याबाबत स्पष्ट धोरण जाहीर झालेले नसल्याने प्रश्न वाढतच आहेत.

सीईटीबाबत अस्पष्टता
नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये होऊ घातली आहे. त्यानंतरच सीईटीबाबत धोरण ठरू शकेल अशी अपेक्षा महाविद्यालय संचालकांना वाटत आहे. सीईटी न झाल्यास जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली तर पुन्हा अडचणी येतील, असाही एक सूर व्यक्त होत आहे. सध्याची कोरोना संक्रमणाची स्थिती पाहता यंदा बीएस्सी प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका घेतल्या जात आहेत.


इतर अॅग्रो विशेष
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा...सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या...
‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत...
कर्मचाऱ्यांनी ‘क्रॉप डॉक्टर’ व्हावे :...पुणे: राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना...
तुरीला मिळणार दराची ‘फोडणी’ पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे....
कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द...
गोंदियात पारा ६.८ अंशांवर पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली...
मराठवाड्यातील रब्बीवर रोगांचे संकट लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
खानदेशात कांदेबाग केळी जोमात जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक...