मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची स्थगित करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया १ डिसेंबर (आज)पासून सुरू करण्यात येत आहे.
पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची स्थगित करण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया १ डिसेंबर (आज)पासून सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची फेरी १० डिसेंबरपासून राबविण्यात
येणार असल्याची माहिती परिषदेच्या सूत्रांनी दिली.
कृषी विद्यापीठांमध्ये दहा विद्या शाखांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. सध्या या अभ्यासक्रमाची ३८ महाविद्यालये कार्यरत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १,३३५ आहे. यापैकी ३३ महाविद्यालये शासकीय व पाच महाविद्यालये कृषी विद्यापीठ अनुदानित आहेत.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत चालू वर्षीच्या शैक्षणिक वर्षांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १० सप्टेंबरपासून चालू करण्यात आली होती. याअंतर्गत उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज व त्यासोबतची आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड केलेली आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली असल्याने प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
९ सप्टेंबरनंतरची सर्व शैक्षणिक संस्थामधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील. परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावे. यानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरू करण्याविषयी उपसचिव कृषी व पदुम विभागाने २६ नोव्हेबर रोजीच्या पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार सर्व कृषी विद्यापीठाअंतर्गत पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. ते वेळापत्रक व प्रवेश माहिती पुस्तिका http://www.maha-agriadmission.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उमेदवारांची गुणवत्ता, प्रवर्ग आणि विकल्प या बाबी विचारात घेऊन प्रवेशाचे वाटप करण्याची पद्धती अवलंबिली जाणार आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रम
एम.एस्सी. (कृषी), एम्.एस्सी. (उद्यानविद्या), एम्.एस्सी. (वनशास्त्र), एम्. एफ्.एस्सी. (मत्स्य विज्ञान), एम्.टेक. (अन्न तंत्रज्ञान), एम.एस्सी. (कृषी जैव तंत्रज्ञान), एम्. टेक्. (कृषी अभियांत्रिकी), एम्.एससी. (गृह विज्ञान), एम्.बी.ए. (कृषी) आणि एम्.एससी (काढणी पश्चात व्यवस्थापन)
विद्यापीठे आणि महाविद्यालये.. | |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) | ११ |
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) | ९ |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) | ११ |
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) | ७ |
कृषी पदव्युत्तर पदवीधारकांसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक.
नियोजन | तारीख |
केटीपीएल व कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिध्दी | १ डिसेंबर (सायंकाळनंतर) |
तक्रार नोंदणीचा कालावधी | २ ते ५ डिसेंबरकेटीपीएल व कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिध्दी |
केटीपीएल व कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिध्दी | ७ डिसेंबर (सायंकाळनंतर) |
पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिध्दी | १० डिसेंबर (सायंकाळनंतर) |
रिपोर्टिंगचा कालावधी | ११ ते १४ डिसेंबर (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) |
दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिध्दी | १६ डिसेंबर (सायंकाळनंतर) |
रिपोर्टिंगचा कालावधी | १७ ते १९ डिसेंबर (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) |
तिसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिध्दी. (रूपांतरासह) | २१ डिसेंबर |
रिपोर्टिंगचा कालावधी | २२ ते २४ डिसेंबर |
रिक्त जागांच्या तपशिलाची प्रसिध्दी | २६ डिसेंबर |
चौथी प्रवेश फेरी (परिशिष्ट जे येथील कार्यपद्धतीनुसार) | २८ व ३० डिसेंबर |
वर्ग सुरु होणार | १ जानेवारी |
- 1 of 657
- ››