Agriculture news in marathi Adopt improved varieties: dr. Patil | Agrowon

शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ. पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा प्रसार करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कडधान्य संशोधन विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. ए. एन. पाटील यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मूर्तिजापूर कृषी विभागाच्या वतीने मौजे कार्ली येथे रब्बी हंगामातील हरभरा पिकाची शेती शाळा आयोजित करण्यात आली. या वेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा प्रसार करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कडधान्य संशोधन विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. ए. एन. पाटील यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मूर्तिजापूर कृषी विभागाच्या वतीने मौजे कार्ली येथे रब्बी हंगामातील हरभरा पिकाची शेती शाळा आयोजित करण्यात आली. या वेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, संदीप गवई, कृषी पर्यवेक्षक युवराज अंभोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, सुधारित वाण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, बीजोत्पादन, प्रक्रिया करून विक्री, उत्पादन वाढ याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली. 

डॉ. पाटील यांनी हरभरा पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान, बीजोत्पादन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन असलेले हरभरा पिकाचे कांचन, कनक या नवीन वाणाविषयी माहिती दिली. अमृता काळे यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. शेगोकार यांनी उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग पिकाच्या लागवडीविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची गरज लक्षात घेता घरचे सोयाबीन बियाणे वापरा, तसेच बियाणे उगवण शक्तीची घरगुती चाचणी कशी करावी? याबाबत सविस्तरपणे तांत्रिक मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे संचालन करीत श्री. शेगोकार यांनी आभार मानले. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप गवई, कृषिमित्र गोपाल निंघोट यांनी पुढाकार घेतला.


इतर बातम्या
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम...अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींना ‘...पुणे : जलजन्य साथरोग, आजारांचा धोका उद्भवू नये,...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...