बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब करा : पवार

Adopt a market-based crop system: Pawar
Adopt a market-based crop system: Pawar

नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन समस्या सध्या शेतीपुढे आहेत. हरितक्रांतीनंतर आपण उत्पादनामध्ये भरीव वाढ केली. परंतु, जास्त उत्पादनाच्या नादात माती व पाणी खराब करून टाकले. यासाठी प्रयत्नपूर्वक पाण्याचा ताळेबंद ठेवणे, बाजारपेठ आधारित पीकपद्धती आणि कृषी हवामान आधारित पीकपद्धतीचा उपयोग करणे गरजेचे आहे,’’ असे मत आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.  

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘न पोचलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विस्तार’’ या  विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला. त्याचा शनिवारी समारोप झाला. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या समितीचे डॉ. अशोक दलवाई, महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. आर. सिन्हा, महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. एल. बी. कलंत्री, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, परिसंवादाचे आयोजक डॉ. मिलिंद अहिरे उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटीतर्फे डॉ. अहिरे यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्काराने, तर २०१७ व २०१८ या वर्षांच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रीय लेखासाठी अनुक्रमे डॉ. एस. व्ही. करंजे व डॉ. रेखा तिवारी यांना गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट लेख सादरीकरणामध्ये विद्यार्थी गटात पहिले, दुसरे व तिसरे पारितोषिक अनुक्रमे पी. यू. राठोड, डॉ. आनंद, संतोष पठाडे यांना मिळाले. तर, उत्कृष्ट संशोधनावर आधारित लेख सादरीकरणामध्ये शास्त्रज्ञ गटात पहिले, दुसरे व तिसरे पारितोषिक अनुक्रमे डॉ. पंडित खर्डे, डॉ. एस. जी. पुरी व डॉ. पी. एस. कापसे यांना मिळाले.

उत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी पहिले पारितोषिक आर. जी. नय्यर, तर दुसरे वीणा एस. जाधव यांना मिळाले. ‘उत्कृष्ट दृकश्राव्य साधनांचा वापर’ या गटात प्रथम पारितोषिक जी. पी. चव्हाण यांना, तर दुसरे साई श्री यांना मिळाले. परिसंवादात देशभरातून २०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पंडित खर्डे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com