सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवण

सेंद्रिय शेती हाच खरा शाश्‍वत मार्ग आहे. शेतकरी बांधवांनी हे तंत्र शेतीपद्धतीमध्ये अंगीकारले पाहिजे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.
Adoption of Organic Farming Techniques: Dr. Dhawan
Adoption of Organic Farming Techniques: Dr. Dhawan

बदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपुल वापर आणि पीक संरक्षणार्थ कीटकनाशकांची वारंवार फवारणी ही प्रचलित शेतीपद्धती. या त्रिसूत्रीवर आधारित प्रचलित शेती पद्धतीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, पर्यावरणीय तसेच आरोग्यविषयक प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी सेंद्रिय शेती हाच खरा शाश्‍वत मार्ग आहे. शेतकरी बांधवांनी हे तंत्र शेतीपद्धतीमध्ये अंगीकारले पाहिजे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (जालना-२) द्वारे ‘सेंद्रिय शेती - विकासाचा शाश्‍वत मार्ग’ या दहादिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दहादिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी अध्यक्षस्थी डॉ. ढवण होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग उपस्थित होते. 

संचालक, विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर व सहयोगी संचालक (संशोधन) तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता, डॉ. एस. बी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दहादिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजक कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी प्रशिक्षणाची सध्याच्या काळातील असणारी गरज आणि एकूणच पूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दलची रूपरेषा याबाबत प्रास्ताविकात विवेचन केले. डॉ. पवार म्हणाले, की यांनी विषमुक्त शेती करण्याकरिता सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे आणि पर्यायाने शेतीचे आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नवयुवकांनी अग्रेसर राहावे. डॉ. देवसरकर म्हणाले, की सध्याच्या बदलत्या हवामानानुसार पिकांची फेरपालट, सेंद्रिय शेती, जमिनीची सुपीकता वाढविणे आणि टिकविणे याकडे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सोबतच सेंद्रिय शेतीकडे शेतकरी बांधवांचा कल वाढविण्याकरिता वेगळी बाजारपेठ निर्माण करावी लागेल. 

डॉ. नेरकर यांनी सेंद्रिय शेती संबंधित असणारे शेतकरी बांधवांचे विविध भ्रम व सेंद्रिय शेतीच्या शास्त्राबाबतीत विस्तृतपणे विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एल. कदम यांनी केले. तर डॉ. एस. एच. उमरीकर यांनी आभार मानले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्याकरिता डॉ. दीपाली कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com