दीड हजार कुंभारांना मिळणार आधुनिक प्रशिक्षण

potters
potters

पुणे ः खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून कुंभार सशक्तीकरण मिशनअंतर्गत दोन वर्षांत सुमारे पंधरा हजार व राज्यामध्ये दीड हजार कुंभार कारगिरांना यांत्रिक चाके व इतर मशीनचे वाटप करण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे; तर पुणे जिल्ह्यातील सुमारे १४० कुंभार काम करणाऱ्या कारागिरांना कुंभार कामाचे आधुनिक प्रशिक्षण दिल्याची माहिती खादी ग्रामोद्योग आयोगाचे संचालक ए. एल. मीना यांनी दिली. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ या कार्यक्रमाचे पुण्यात नुकतेच आयोजन केले होते. त्या वेळी श्री. मीना यांनी ही माहिती दिली. या वेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे मुख्य प्रबंधक श्रीधर भागवत, महाप्रबंधक अनिल लिमये, खादी ग्रामोद्योग आयोगाचे उपसंचालक राजीव खन्ना, माती कला विकास सेलचे चेअरमन दत्ता कुंभार, अशोक सोनवणे, विठ्ठलराव राऊत, मोहन जगदाळे, शाम राजे आदी उपस्थित होते. श्री. मीना म्हणाले की, बारामती-भोर, कामशेत, घोडेगाव, पिरंगुट व मुंढवा येथे दहा दिवसांचे आधुनिक कुंभारी कलेचे प्रशिक्षण कारागिरांना देण्यात आले आहे. विजेवर चालणारी १४० यांत्रिक चाके; तसेच पाच कारागिरांना मिळून एक चिखल मशागत यंत्र व एक चिखल मळणी यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. मशीनमुळे कुंभार काम करणाऱ्या कारागिरांचे उत्पादन तीनपट वाढणार असून, चिखल बनविणे व इतर कामांसाठी लागणारे कष्ट कमी होणार आहेत. उपलब्ध असणाऱ्या स्थानिक मातीपासून चांगल्या प्रकारच्या मातीच्या वस्तू बनविता येणार आहेत. याशिवाय पाच कारागिरांच्या समूहामध्ये मातीची भांडी भाजण्यासाठी एक आधुनिक भट्टीही खादी ग्रामोद्योग आयोग बांधून देणार आहे; तसेच आखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेने राज्यातील व इतर जिह्यांतील कुंभार कारागिरांना या योजनेचचा लाभ मिळण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाकडे आणखी दोन हजार यांत्रिक चाकांची मागणी प्रस्तावाद्वारे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com