'सीआयसीआर'ने महिलांना दिले प्रगत शेतीचे धडे

सीआयसीआरने महिलांना दिले प्रगत शेतीचे धडे
सीआयसीआरने महिलांना दिले प्रगत शेतीचे धडे

गडचिरोली  ः केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरच्या वतीने महिला शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम केव्हीके सोनापूर येथे पार पडला. सीआयसीआरच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विनिता गोतमारे यांची या वेळी मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.  केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कऱ्हाळे, सहयोगी प्राध्यापक डॉ. आर. एस. वाघमारे, डॉ. रामकृष्ण, डॉ. दीपक नगराळे, डॉ. विक्रम कदम यांची या वेळी उपस्थिती होती. आदिवासी उपयोजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या वेळी डॉ. गोतमारे यांनी दिली. कापसाची अपेक्षित उत्पादकता मिळविण्यासाठी जमीन, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीसाठी निवडण्यात येणारे वाण हे महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचा शेतीत राबता अधिक आहे. त्यामुळे महिलांनी निरीक्षणवृत्ती जपावी त्याकरिता आवश्‍यक ते तांत्रिक ज्ञान मिळविण्यासाठी केव्हीके तसेच तत्सम यंत्रणांच्या संपर्कात सातत्य राखण्याची गरज आहे, असा सल्लाही डॉ. गोतमारे यांनी दिला. डॉ. संदीप कऱ्हाळे यांनी केव्हीके मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. डॉ. रामकृष्ण यांनी खतांचा नियंत्रित वापर याविषयी मार्गदर्शन केले. रसायनांचा शेतीत कमीत कमी वापर करण्याचे आवाहन डॉ. दीपक नगराळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ताथोड यांनी कले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com