कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-रोगवर मार्गदर्शन 

agri exhibition
agri exhibition

औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा कृषिविभाग आणि शासनाच्या कृषी विभागाच्या दालनावर शासनाच्या विविध योजनांसह मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन तसेच कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, त्यासंबंधीची माहितीही खास माहितीपत्रकातून शेतकऱ्यांना दिली जात आहे. 

कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी विविध ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती आवर्जून घेत आहेतच. पण शेतीसाठी फायदेशीर असणारया विविध शासकीय योजनांची माहिती घेण्याकडे त्यांचा कल दिसतो आहे. कृषी विभागाच्या स्टॅालवर त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची माहिती, त्यातील निकष, लाभ याची माहिती देण्यात येते आहे. त्याशिवाय राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत सेंद्रिय शेतीची माहिती मिळते आहे. तसेच राष्ट्रीय पीकविमा योजनेबाबतही जागरुकता करण्याच्या उद्देशाने माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते आहे. तर याच स्टॅालवर कृषी तंत्र व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने विविध फळे, कडधान्य, फुले यांची गुणवत्तापूर्ण उत्पादन याठिकाणी पाहायला ठेवण्यात आली आहेत. 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित स्टॅालवर मक्यावरील लष्करी अळी आणि कापसावरील गुलाबी बोंड अळीबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. १५३ गावांत लवकरच लष्करी अळीच्या नियंत्रणाबाबत जागरुकता मोहीम राबवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनात शेतकरीही त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com