agriculture news in Marathi advise on pest and decease on agriculture department store Maharashtra | Agrowon

कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-रोगवर मार्गदर्शन 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 डिसेंबर 2019

औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा कृषिविभाग आणि शासनाच्या कृषी विभागाच्या दालनावर शासनाच्या विविध योजनांसह मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन तसेच कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, त्यासंबंधीची माहितीही खास माहितीपत्रकातून शेतकऱ्यांना दिली जात आहे. 

कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी विविध ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती आवर्जून घेत आहेतच. पण शेतीसाठी फायदेशीर असणारया विविध शासकीय योजनांची माहिती घेण्याकडे त्यांचा कल दिसतो आहे. कृषी विभागाच्या स्टॅालवर त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा कृषिविभाग आणि शासनाच्या कृषी विभागाच्या दालनावर शासनाच्या विविध योजनांसह मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन तसेच कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, त्यासंबंधीची माहितीही खास माहितीपत्रकातून शेतकऱ्यांना दिली जात आहे. 

कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी विविध ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती आवर्जून घेत आहेतच. पण शेतीसाठी फायदेशीर असणारया विविध शासकीय योजनांची माहिती घेण्याकडे त्यांचा कल दिसतो आहे. कृषी विभागाच्या स्टॅालवर त्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची माहिती, त्यातील निकष, लाभ याची माहिती देण्यात येते आहे. त्याशिवाय राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातंर्गत सेंद्रिय शेतीची माहिती मिळते आहे. तसेच राष्ट्रीय पीकविमा योजनेबाबतही जागरुकता करण्याच्या उद्देशाने माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते आहे. तर याच स्टॅालवर कृषी तंत्र व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने विविध फळे, कडधान्य, फुले यांची गुणवत्तापूर्ण उत्पादन याठिकाणी पाहायला ठेवण्यात आली आहेत. 

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित स्टॅालवर मक्यावरील लष्करी अळी आणि कापसावरील गुलाबी बोंड अळीबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. १५३ गावांत लवकरच लष्करी अळीच्या नियंत्रणाबाबत जागरुकता मोहीम राबवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रदर्शनात शेतकरीही त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...