agriculture news in marathi advisory on pomegranate | Agrowon

डाळिंब सल्ला

डॉ. नृपेंद्र सिंह, डॉ आशीष मायती, डॉ मल्लिकार्जुन, डॉ ज्योत्स्ना शर्मा, दिनकर चौधरी, युवराज शिंदे
मंगळवार, 21 एप्रिल 2020

मृग बहार / अर्ली मृग बहारातील ताणावर असलेल्या झाडांना फळ तोडणी संपल्यावर आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्य छाटणी झाल्यानंतर खतांची मात्रा दिलेली असेल. ही मात्रा लागू होण्यासाठी हलके पाणी द्यावे.

मृग बहार / अर्ली मृग बहार
(जून - जुलै फूलधारणा)

बागेची सध्याची अवस्था - विश्रांती / ताण अवस्था

व्यवस्थापन

 • ताणावर असलेल्या झाडांना फळ तोडणी संपल्यावर आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्य छाटणी झाल्यानंतर खतांची मात्रा दिलेली असेल. ही मात्रा लागू होण्यासाठी हलके पाणी द्यावे.
 • बहार धरण्यापूर्वी १-२ महिने (जमिनीच्या प्रकारानुसार ) पाणी बंद ठेवावे.
 • प्रत्येक १५ दिवसानंतर बोर्डो मिश्रण (१ टक्के ) या प्रमाणे फवारणी घ्यावी.
 • फळ तोडणीनंतर झाडाच्या खोडाना गेरू किंवा लाल मातीची पेस्ट तयार करून जमिनीपासून दीड ते दोन फूट अंतरापर्यंत व्यवस्थितरित्या लावावी.
 • पेस्टसाठी प्रमाण -
  गेरू/लाल माती ४ किलो अधिक क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २० मिलि अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड (५० % डब्ल्यूपी) २५ ग्रॅम अधिक १० लीटर पाणी)

हस्त बहार / लेट हस्त बहार -
(सप्टेंबर - ऑक्टोबर फूलधारणा)

बागेची सध्याची अवस्था -
फळ तोडणी / फळ पक्वता अवस्था

व्यवस्थापन 

 • फळ तोडणीसाठी तयार असल्यास फळे फुटू नयेत म्हणून नियमित हलके पाणी द्यावे.
 • फळ पक्व झाल्यास लगेचच फळ तोडणी करावी. उशिरा फळ तोडणी केल्यास आतील दाणे खराब होण्याची शक्यता असते. तसेच फळे तडकण्याचीही समस्या येऊ शकते.
 • फळ तोडणी झाल्यानंतर लगेच मुख्य छाटणी करावी. सेंद्रिय व रासायनिक खते द्यावीत. डाळिंब संशोधन केंद्राच्या वेबसाईटवर दिलेल्या अन्नद्रव्य व्यवस्थापन आराखडा-२०१९ प्रमाणे जैविक खते द्यावीत.

आंबे बहार - 
(फेब्रुवारी - मार्च फुलधारणा )

बागेची सध्याची अवस्था
फुलधारणा अवस्था (फुलधारणेनंतर २० ते २५ दिवस )

व्यवस्थापन

 • नॅप्थील अॅसेटिक अॅसीड (एनएए) (४.५ %) या संजीवकाची ४५ मिलि प्रती २०० लीटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.
 • १ ते १.५ किलो प्रती हेक्टर सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्रणाची फवारणी करावी.

बागेची सध्याची अवस्था-
फळ तयार होण्याच्या अवस्थेस प्रारंभ (पानगळीनंतर ५० ते ८० दिवस )

व्यवस्थापन

 • मोनो पोटॅशियम फॉस्फेट (००:५२:३४) हे विद्राव्य खत ८.५ किलो प्रति हेक्टर प्रति वेळी याप्रमाणे ७ दिवसाच्या अंतराने ३ वेळा ड्रिपद्वारे द्यावे.
 • मोनो पोटॅशियम फॉस्फेट (००:५२:३४ ) ८.५ किलो आणि सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०) १६.३० किलो ही विद्राव्य खते आणि यूरिया २२.५० किलो ही खते प्रति हेक्टर प्रती वेळ याप्रमाणे ५ वेळा ७ दिवसाच्या अंतराने द्यावे.
 • जिप्सम १.७० ते १.८० किलो प्रती झाड आणि मॅग्नेशिअम सल्फेट ७००-८०० ग्रॅम प्रती झाड या प्रमाणे जमिनीतून द्यावे.
 • जिबरेलिक अॅसिड (५० पीपीएम तीव्रता) या संजीवकाच्या १५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या घ्याव्यात. त्यानंतर समिश्र सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी १ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर या प्रमाणे करावी.
 • महिन्यातून एकदा बोर्डो मिश्रण (०.५ % ) किंवा कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड १ ते २ ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे ताम्रयुक्त बुरशीजनकाची फवारणी करावी. वेबसाईटवर आयडीआयपीएम वेळापत्रकानुसार आवश्यक कीटकनाशके व बुरशीनाशके यांची फवारणी घेता येईल.

संपर्क - डी. टी. चौधरी, ९६२३४४४३८०
(तांत्रिक अधिकारी आणि विस्तार प्रभारी , भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)


इतर फळबाग
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...
दर्जेदार पेरू, सीताफळाच्या उत्पादनावर भरमाझ्याकडे पेरू आणि सीताफळाची लागवड आहे. पेरूच्या...
गावोगावी फिरून विकली पंधरा टन द्राक्ष कोरोनामुळे बाजार समित्या बंद झाल्या, व्यापारीही...
जास्तीच्या ओलाव्यामुळे येणाऱ्या ...गेल्या आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला व काही...
केळी पीलबागेचे व्यवस्थापन, खर्च कमी... माझी काळी कसदार दहा एकर शेती आहे. दोन...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
थेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष   बागेत द्राक्ष घड काढणीला आले आणि कोरोनाचे...
‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...
सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्यपांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
लिंबूवर्गीय फळपीक सल्लाशेतीमध्ये काम करण्याची परवानगी असली तरी ते काम...
डाळिंब सल्लामृग बहार / अर्ली मृग बहार (जून - जुलै...
फळझाडांचे आच्छादन, ठिंबक सिंचन महत्वाचेउन्हाळ्यात फळबागांना पाण्याची टंचाई जाणवते. अशा...
संत्रा पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे...संत्रा बागेत पाने पिवळी पडण्याची समस्या अनेक...
द्राक्षबागेतील अवस्थांनुसार व्यवस्थापनसध्याच्या काळात बागेतील घडांच्या स्थितीनुसार...
असे करा दर्जेदार चिकू उत्पादनाचे नियोजनचिकू फळांना योग्य दर मिळण्यासाठी योग्य आकार व...
द्राक्षबागेतील वेगवेगळ्या अवस्थांनुसार...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत वेगवेगळ्या...
अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय फळबागेचे...स ध्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...