agriculture news in marathi advisory regarding cattle health | Agrowon

घटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादन

डॉ. सुधाकर आवंडकर, डॉ.महेश कुलकर्णी
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

घटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच वेळा लक्षणे दाखविण्याआधीच जनावरांमध्ये मरतुक होते. साधारणतः म्हशी आणि संकरित जनावरांमध्ये मरतुकीचे प्रमाण अधिक आढळते.
 

घटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच वेळा लक्षणे दाखविण्याआधीच जनावरांमध्ये मरतुक होते. साधारणतः म्हशी आणि संकरित जनावरांमध्ये मरतुकीचे प्रमाण अधिक आढळते.

घटसर्प हा गायी आणि म्हशींमध्ये आढळणारा जीवाणूजन्य आजार आहे. तो सांसर्गिक आजार असून पास्चुरेल्ला मल्टोसिडा (सिरोटाईप: ब२ आणि इ२) जिवाणूमुळे होतो. घटसर्प हा प्रामुख्याने गायी आणि म्हशींमध्ये दिसत असला तरी तो शेळ्या, मेंढ्या आणि डुकरांमध्ये सुद्धा दिसून येतो. याव्यतिरिक्त घोडे, उंट, याक, गाढव आणि हत्तींना आजाराचा संसर्ग होऊ शकतो. पशुपालकांच्या दृष्टीनेही हा आजार अत्यंत महत्त्वाचा आहे. आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच वेळा लक्षणे दाखविण्याआधीच जनावरांमध्ये मरतुक होते. साधारणतः म्हशी आणि संकरित जनावरांमध्ये मरतुकीचे प्रमाण अधिक आढळते.

प्रादुर्भाव आणि प्रसार

 • जवळपास ५ टक्के गाई आणि म्हशींच्या टॉन्सील्समध्ये नैसर्गिकरीत्या काही प्रमाणात पास्चुरेल्ला मल्टोसिडा जिवाणू असतात. मात्र निरोगी जनावरांची रोग प्रतिकार शक्ती त्यांची संख्या मर्यादित ठेवते. जनावरांना ज्यावेळी ताण येतो त्यावेळी हे जिवाणू वाढतात आणि नाका-तोंडावाटे शरीराबाहेर टाकले जातात.
 • जनावरांना ताण येण्यासाठी बरेच घटक कारणीभूत असतात. त्यामध्ये वातावरणात अचानक होणारा बदल आणि अति-उत्पादन क्षमता हे महत्त्वाचे घटक आहेत. उच्च तापमान आणि अति आर्द्रता यासारखे वातावरणीय बदल अतिशय जास्त ताण उत्पन्न करतात. या घटकांव्यतिरिक्त लांब प्रवास, इतर आजार, जंत-गोचीड होणे, रक्त-क्षय, अपुरे पोषण, अधिक दूध उत्पादन आणि अत्याधिक श्रमामुळे सुद्धा ताण येतो.
 • जनावरांवर ताण असला त्यांची रोग प्रतिकार शक्ती क्षीण होते. आर्द्र वातावरणात हा जिवाणू दीर्घकाळ तग धरू शकतो, क्षीण रोग प्रतिकारशक्ती असलेल्या जनावरांना बाधित करतो.
 • साधारणतः पावसाळ्याच्या उत्तरार्धात आणि त्यानंतर हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र इतर ऋतूत सुद्धा या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. साधारणतः लांब अंतरावरील वाहतुकीमुळे जनावरांवर ताण येतो आणि जनावरे आजारी पडतात. म्हणून या आजारास “शिपिंग फिवर” असे सुद्धा म्हणतात.
 • प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काद्वारे हे जिवाणू अत्याधिक संख्येने जनावरांच्या शरीरात जातात. रक्तावाटे शरीराच्या इतर भागात पोहचून आजार निर्माण करतात.
 • आजाराचा प्रसार बाधित किंवा वाहक जनावराच्या प्रत्यक्ष संपर्काने होतो. त्याच प्रमाणे बाधित अथवा वाहक जनावरांच्या नाका-तोंडातील स्त्रावाने वैरण, खाद्य, पाणी किंवा पशुपालनात वापरत येणारी उपकरणे यांना जिवाणू संसर्ग झालेला असल्यास त्यांच्या अप्रत्यक्ष संपर्काने या आजाराचा प्रसार होतो.

असा होतो आजार 

 • जिवाणू संवेदनशील जनावराच्या शरीरात गेले की ते टॉन्सिल्स आणि गळ्यातील उतींमध्ये वाढतात. त्यानंतर ते बाधित जनावराच्या रक्ताभिसरण संस्थेत प्रवेश करतात. परिणामी जनावरांना ताप येतो.
 • रक्तावाटे जिवाणू शरीराच्या इतर भागातील उतींमध्ये प्रवेश करतात. त्या ठिकाणी त्यांची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे उतींना इजा निर्माण होते. रोग प्रतिकार शक्ती याविरोधात सायटोकाईन प्रतिसाद तयार करते. परिणामी हे जिवाणू मरतात आणि त्यापासून लायापो-पोलीस्याखेराईट नावाचे विष तयार होते. हे विष शरीरभर पसरून जनावरास अत्याधिक ताप येतो. हा घात सहन न झाल्यास बाधित जनावर अचानक कोलमडते आणि मृत्यू पावते.

प्रमुख लक्षणे

 • आजाराची लक्षणे दिसण्यास बाधा झाल्यापासून साधारणतः एक ते तीन दिवस लागतात. अतितीव्र प्रकारात प्रथम लक्षणे दिसण्याच्या काळात चोवीस तासांत मृत्यू येऊ शकतो.
 • कमी तीव्र प्रकारात १०४ ते १०६ अंश फॅरानाईटपर्यंत ताप येणे, नाका-तोंडातून स्त्राव वाहतो, श्वसनास अडथळा येतो, जनावर मलूल होते, भूक मंदावते, हालचाल कमी होते, अस्वस्थ होते, गळा तसेच पोळीवर सूज येते, पोटात दुखते, हगवण लागते. पडून राहणे इत्यादी लक्षणे दिसतात.

निदान 
साधारणतः लक्षणांवरून आजाराचे निदान करता येते. परंतु अतितीव्र प्रकारात निदान करणे अतिशय कठीण असते. अशावेळी ताप असताना बाधित जनावराच्या कानाच्या शिरेतून रक्तनमुना गोळा करून प्रयोगशाळेत पाठवावा. त्याची काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली बघून तसेच जिवाणू संवर्धन करून पक्के रोग निदान करता येते.

उपचार आणि प्रतिबंध 

 • आजाराच्या प्रथम टप्यात दिलेली प्रतिजैविके अत्यंत प्रभावी ठरतात. परंतु हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. तो लगेच लक्षात येत नाही म्हणून प्रतिजैविके देण्यास विलंब लागतो आणि आजार वाढतो.
 • आजार होऊ नये यासाठी लसीकरण करणे अत्यंत आवश्यक ठरते. या आजारावर विविध प्रकारच्या मृत लसी उपलब्ध आहेत. त्या साधारणतः नऊ ते बारा महिने पर्यंत आजारापासून बचाव करण्यास सक्षम असतात.
 • दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे. सहा महिने वयाच्या वासरास प्रथम लस द्यावी. दुसरी मात्रा तीन महिन्याच्या फरकाने द्यावी. त्यानंतर दरवर्षी एक मात्रा द्यावी.

संपर्क- डॉ.सुधाकर आवंडकर,९५०३३९७९२९
(पशुवैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
मिथेन उत्सर्जनावर नियंत्रणाची गरजजनावरे रवंथ करताना मोठ्या प्रमाणात मिथेन वायू...
सांसर्गिक गर्भपाताचे नियंत्रणसर्व वयोगटातील जनावरे सांसर्गिक गर्भपात आजारास...
लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रणलाळ्या खुरकूत आजारामुळे जनावराच्या तोंडातून सतत...
गाई, म्हशींचे गाभण काळ, व्यायल्यानंतरचे...गाई, म्हशी गाभण असताना शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे...
भातशेतीत कीड नियंत्रणासाठी बेडूक...भातशेतीमध्ये विविध किडींचे नैसर्गिक नियंत्रण...
गाई,म्हशीतील गर्भधारणेसाठी योग्य काळ वाढत्या दुग्धोत्पादन क्षमतेसोबतच उच्च उत्पादक गाई...
जनावरांतील फऱ्या आजाराचे नियंत्रणफऱ्या हा गायी आणि म्हशींचा तीव्र, ज्वर सूचक...
शेळ्या-मेंढ्यामधील मावा आजारमावा हा विषाणूपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे....
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
रेबीजकडे नको दुर्लक्ष...कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज आजाराचा प्रसार...
घटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादनघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच...
संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचेस्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...