agriculture news in marathi advisory regarding sugarcane Management | Agrowon

व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...

डॉ. किशोर झाडे, डॉ. बस्वराज पिसुरे   
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जfवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.
 

पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जfवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.

पीक वाढीनुसार पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, कमी होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर ऊस पाचट व्यवस्थापन हा योग्य व शाश्वत उपाय आहे.  खोडवा उसाकडे दुर्लक्ष होते. उसाची तोडणी झाल्यानंतर बहुतांशी क्षेत्रावरील उसाचे पाचट जाळून टाकले जाते. तसेच शेणखत वापराचे प्रमाण कमी झाले आहे. पाचट जाळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जळून नष्ट होतात, परिणामी जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण फारच कमी होते. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे. 

ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक सरी ठेवून कुजविल्यास पाण्याचा वापर ५० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होऊ शकतो.  जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते. अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा खर्चात बचत होते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून ओलावा जास्त काढण्यास मदत होते. पाचट शेतातच ठेवल्याने तणांचे व्यवस्थापन होते.

सेंद्रिय खताची उपलब्धता

  • एक हेक्‍टर क्षेत्रामधून सुमारे १० ते १२  टन वाळलेले पाचट मिळते. हे पाचट न जाळता ते कुजवल्यास सहा ते सात टन सेंद्रिय खत मिळते. यामुळे जमिनीची सुपीकता सातत्याने वाढते. 
  • पाचट तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता तीन ते चार वर्षे टिकून राहील तितकेच खोडव्याचे पीकही सातत्याने घेता येईल. यामुळे बेणे, मशागत व मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल.

उत्पादनात भरीव वाढ
कोणत्याही निविष्ठावर विनाकारण खर्च न करता पाचट तंत्रज्ञानामुळे यामुळे उत्पादनात १० ते  १५ टक्के वाढ होते. पाचट शेतात ठेवल्यामुळे पाल्यातील मुख्य अन्नद्रव्य उदा. नत्र  ४० ते ५० किलो, स्फुरद २० ते ३०  किलो, पोटॅश ७५ ते १०० किलो तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, मंगल, तांबे, जस्त ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पाचटाचे विघटन होताना ऊस पिकास उपलब्ध होतात. त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम दिसून येतो.

जमिनीचे तापमान

  • रुंद सरी पद्धतीने ऊस लागवड केल्याने जमिनीवर अधिक काळ सूर्यप्रकाश राहतो. त्यामुळे पिकास उपयोगी सूक्ष्मजंतू व गांडुळाची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. 
  • पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच सेंद्रिय खताची उपलब्धता वाढते. त्यामुळे जीवाणू वा गांडुळांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.
  • दिलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून ते पिकास उपलब्ध होतात. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.

आंतर पीक
खोडवा उसामध्ये पाला एक आड एक सरीमध्ये ठेवल्यामुळे एक सरी रिकामी राहते. या सरीत शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी इत्यादी द्विदलवर्गीय पिके घेऊन ती पक्व झाल्यानंतर त्यांच्या केवळ शेंगा काढून घ्यावेत. उर्वरित अवशेष त्याठिकाणी सरीत राहू दिल्याने सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते. साधारणपणे दहा गुंठयात अर्धा ते एक किलो कडधान्य पेरल्यास सुमारे २५ ते ३० किलो पर्यंत उत्पादन मिळू शकते.

पाचट शेतात ठेवण्याचे फायदे 
मशागतीच्या खर्चात ५० टक्के बचत 

  • ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकरी उसाचे पाचट जाळून टाकतात, सर्व सरीच्या बगला फोडून रासायनिक खताची मात्रा देऊन पाणी दिले जाते. पाणी व खताच्या जरुरीपेक्षा अधिक वापराने तणांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. 
  • उसाचे पाचट न जाळता ते एक आड एक ठेवल्यास किंवा सर्व सरीत पाचट दाबून बसवावे.  या आच्छादनामुळे जागेवर तण उगवत नाहीत. त्यामुळे अन्नद्रव्यांचा होणारा अपव्यय व तण व्यवस्थापनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.

ओलावा टिकतो 

  • पाचट एक आड एक सरी  किंवा सर्व सरीत ठेवल्यानंतर सर्व सरीत पाणी देण्यासाठी एक आड एक सरीस पाणी द्यावे लागते. तसेच पाचट ठेवल्यामुळे ५० टक्के क्षेत्र आच्छादित राहते. त्यामुळे  बाष्पीभवन कमी होते. 
  • जमिनीतील ओलावा १५ ते २० दिवस टिकून राहतो. यामुळे पाणी देण्याची वारंवारता कमी होऊ शकते.  शिवाय केशाकर्षणाद्वारे पाचट ठेवलेल्या सरीतील माती पाणी शोषत असल्याने पाणी दिल्यावरही लवकर वाफसा येतो. त्यामुळे जमिनीमध्ये पाणी व हवा योग्य संतुलन राहून मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

पाचटातील अन्नद्रव्ये (प्रमाण टक्के) सूक्ष्म अन्नद्रव्ये (पीपीएम) 
 

अन्नद्रव्ये     प्रमाण टक्के अन्नद्रव्ये     प्रमाण पीपीएम
नत्र ०.५     लोह     २४४०
स्फुरद     ०.१३     मंगल     ३१०
पालाश     ०.४०     जस्त     ९०
कॅल्शिअम     ०.५५     तांबे     ३०
मॅग्नेशिअम     ०.३०     गंधक     ०.१२

संपर्क ः डॉ. किशोर झाडे, ९९२१८०८१३८
(कृषी विज्ञान केंद्र, औंरगाबाद-१)


इतर नगदी पिके
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन...पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व...
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रराज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस  तुटून...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...
दर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे...सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंतामाझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले...
दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्रमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक...सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक...
कपाशीतील बोंडे सडण्यावरील उपाययोजनामहाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात...