Agriculture news in marathi Affordability of cotton growers due to lack of shopping center | Agrowon

खरेदी केंद्राअभावी कापूस उत्पादकांची परवड 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

उमरखेड येथे कापूस खरेदी केंद्र नसल्याने उमरखेड, दिग्रस, महागाव या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची होरपळ होत आहे. त्याची दखल घेत उमरखेड येथे कापूस खरेदी केंद्राला मान्यता द्यावी, अशी मागणीवनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.

यवतमाळ  : उमरखेड येथे कापूस खरेदी केंद्र नसल्याने उमरखेड, दिग्रस, महागाव या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची होरपळ होत आहे. त्याची दखल घेत उमरखेड येथे कापूस खरेदी केंद्राला मान्यता द्यावी, अशी मागणी उमरखेड बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.

यवतमाळचे पालकमंत्री, वनमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन कापूस खरेदी केंद्राचा मुद्दा त्यांच्याकडे मांडण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ तसेच भारतीय कापूस महामंडळ यांच्या वतीने जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र कापसाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या दिग्रस, उमरखेड, महागाव या तीन तालुक्यात एकही केंद्र देण्यात आले नाही. उमरखेड येथे हमीभाव कापूस केंद्र असल्यास महागाव व दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांची सोय होते. मात्र या वेळी उमरखेडला देखील वगळण्यात आले.

उमरखेड, दिग्रस, महागाव या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्णी येथील केंद्राशी जोडण्यात आले आहे. आर्णी येथे कापूस विकायचा झाल्यास शेतकऱ्यांना १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापावे लागते. त्यामुळे त्यांचा वाहतुकीवर मोठा खर्च होतो. परिणामी हमीभाव मिळून देखील त्याचा फारसा उपयोग होत नाही. , ही चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. उमरखेड तालुक्यातील बाजार समिती कार्यक्षेत्रातील ९९८ कापूस उत्पादकांनी कापूस विक्री करता समिती कार्यालयात नोंदणी केली आहे. ही माहिती पणन महासंघाला कळवण्यात आली.

उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग-प्रेसिंग सोसायटी लिमिटेड यांनी कापूस जिनिंग युनिट व त्या अनुषंगाने इतर सोयीसुविधा खरेदी सुरू होण्यापूर्वी अद्ययावत करण्याबाबत या कार्यालयास लेखी कळवले आहे. तालुक्यात १५७ गावे आहेत, या गावांतील कापूस उत्पादकांचा वेळ व पैसा हमीभाव केंद्र विना खर्च होणार आहे. हे हेलपाटे थांबण्यासाठी उमरखेड येथे हमीभाव केंद्राची सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...