तब्बल २५ वर्षांनंतर पाणंद रस्त्याने घेतला मोकळा श्वास

तब्बल २५ वर्षांनंतर पार्लेतील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य
तब्बल २५ वर्षांनंतर पार्लेतील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी जमिनीच्या केलेल्या अतिक्रमणामुळे गेली २५ वर्षे बंद असलेला पार्ले (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील नकाशावरील डुबलकी पाणंद रस्ता महाराजस्व अभियानातून खुला करण्यात महसूल प्रशासनाला यश आले. तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे आणि तलाठी संजय सावंत आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली. शेतकऱ्यांनी आपसातील मतभेद आणि गटतट विसरून सर्वांची सोय व्हावी यासाठी टाकलेले हे पाऊल अन्य गावातील शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरले आहे. संबंधित रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

पार्ले येथील येथील डुबलकी पाणंद रस्ता अतिक्रमणामुळे बंद होता. त्यामुळे शेतमाल बाहेर काढताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यासंदर्भात सह्याद्री साखर कारखान्यानेही पत्र दिले होते. याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार वाकडे यांना भेटून गैरसोयींबाबतची माहिती दिली. त्याची दखल घेऊन तातडीने तहसीलदार यांनी मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे व तलाठी संजय सावंत यांना रस्त्याची स्थिती पाहूण नियमानुसार रस्ता खुला करण्याची कार्यवाही करण्यास सांगितले. 

त्यानुसार मंडल अधिकारी, तलाठी यांनी शेतकरी भास्कर नलवडे, आनंदा नलवडे, मनोज नलवडे, शिवाजी नलवडे, सोमना नलवडे, उत्तम पाटील, संदीप नलवडे, रुपेश नलवडे, विकास नलवडे, मारुती नलवडे, विवेक नलवडे, आण्णासाहेब नलवडे, सूरज नलवडे यांच्यासह शेतकऱ्यांच्या व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, संपतराव नलवडे, महेश नलवडे यांच्या सहकार्यातून कार्यवाही सुरू केली. त्याला शेतकऱ्यांनीही चांगली साथ दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com