agriculture news in Marathi after 75 years onion auction started Maharashtra | Agrowon

कांदा लिलावातील अमावास्येचे ‘ग्रहण’ अखेर ७५ वर्षांनंतर सुटले 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

कांदा पिकाच्या अनुषंगाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र बाजार समिती अस्तित्वात आल्याच्या ७५ वर्षांपासून अमावास्येला मुख्य आवारात कांदा व धान्य लिलाव बंद ठेवले जायचे. तर विंचूर उपबाजार येथे आवारात कामकाज सुरू होते.

नाशिक : कांदा पिकाच्या अनुषंगाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र बाजार समिती अस्तित्वात आल्याच्या ७५ वर्षांपासून अमावास्येला मुख्य आवारात कांदा व धान्य लिलाव बंद ठेवले जायचे. तर विंचूर उपबाजार येथे आवारात कामकाज सुरू होते. याबाबत बाजार समितीला उशिरा का होईना कामकाज सुरू करण्याबाबत शहाणपण आले आहे. आता बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदा याबाबत बदल करून अमावास्येच्या दिवशीही कांद्याचे लिलाव सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय बाजार समिती व्यवस्थापन, प्रशासन व मर्चन्ट्‌स असोसिएशनने मंगळवारी (ता. ८) संयुक्त बैठकीत घेतला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सूचनेप्रमाणे बाजार समितीतील कांदा लिलाव २४ दिवस बंद होते. त्यात खरीप हंगाम तोंडावर असल्याने बाजार समिती कामकाज सुरू राहावे, अशी शेतकऱ्यांचीही मागणी होती. बाजार समितीने या मागणीचा विचार करून लासलगाव मर्चन्ट्‍स असोसिएशनच्या सभासदांसोबत चर्चा केली. त्यामध्ये अमावास्येच्या दिवशी कामकाज सुरू करण्याचे निश्‍चित करत अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढली आहे. येत्या अमावास्येपासून सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

कारण होते अस्पष्टच 
लासलगाव बाजार समितीची स्थापना झाल्यापासून तर आजअखेर गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला कांदा व धान्य लिलाव होत नव्हते. अमावस्येला लिलाव का बंद राहतात याबाबत स्पष्ट कारण दिले जात नव्हते. आता या कुप्रथेला फाटा देत दर अमावास्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव आता होणार आहेत. 

प्रतिक्रिया
एक दिवस कामकाज बंद राहिले तर ४ कोटींचे व्यवहार ठप्प होतात. अमावास्येला कामकाज बंद राहिल्यास शेतकऱ्यांचीही गैरसोय होते. ही बाब विचारात घेता चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. अलीकडे उलाढाल वाढली आहे. त्यामुळे व्यापारी व बाजार समितीचे नुकसान टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीस आणावा. 
- सुवर्णा जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती 
 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...