युती सरकारच्या काळात नाशिकचा विकास मागे : भुजबळ

युती सरकारच्या काळात नाशिकचा विकास मागे : भुजबळ
युती सरकारच्या काळात नाशिकचा विकास मागे : भुजबळ

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात मंजूर केलेल्या, सुरू असलेल्या विकासकामांची गेल्या पाच वर्षांत परवड झाली. मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही. नवीन विकासकामे फारशी झालीच नाहीत. त्यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी कमी झाली. युती सरकारच्या काळात नाशिकचा विकास मागे राहिला, असा आरोप संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ यांनी केला.  

गेल्या पाच वर्षांत सरकारकडून सापत्नपनाची वागणूक देऊन नाशिककर केवळ अन्याय केला, अशी टीकाही भुजबळ यांनी केली. 

हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे आयोजित राजकीय जनजागृती कार्यक्रमात भुजबळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

भुजबळ म्हणाले, ''नाशिक ही शेतमालाची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून फूड पार्क आणि कृषी टर्मिनल मंजूर करून घेतले. मात्र, सरकार बदलल्यानंतर ते रद्द करण्यात आले. महिलांना रोजगार मिळावा, यासाठी दिल्ली हटच्या धर्तीवर कलाग्रामची निर्मिती केली. मात्र, सध्याच्या सरकारने ते सुरू केले नाही.''

''जिल्ह्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एकलहरे प्रकल्पाचे आधुनिकीकरणास मंजुरी घेतली. मात्र, त्याचे काम सध्याच्या सरकारने पूर्ण केले नाही. हा प्रकल्प रद्द करून तो दुसरीकडे पळविण्याचे काम केले,'' असाही टोला भुजबळ यांनी लगावला.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. या वेळी माजी आमदार जयवंतराव जाधव, काॅँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शरद आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. रमेश शेजवळ यांनी केले. प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com