agriculture news in marathi, After the artificial inspection, technology will be filled with emphasis: District Magistrate | Agrowon

शेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर भर हवा : जिल्हाधिकारी मांढरे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ राबविताना केवळ उत्पादनवाढीकडे लक्ष केंद्रित करून चालणार नाही. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठीही विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी शेतीमाल क्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विपणन यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ राबविताना केवळ उत्पादनवाढीकडे लक्ष केंद्रित करून चालणार नाही. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठीही विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी शेतीमाल क्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विपणन यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून मांढरे बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जि. प. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील आदी उपस्थित होते.

मांढरे म्हणाले, ‘‘मागील हंगामात २६२५.७० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचा लक्ष्यांक होता. मात्र १६८६.९९ कोटी रुपये म्हणजेच फक्त ६४ टक्के कर्ज वितरण झाले. यावर्षी पीक कर्जाच्या वितरणासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करून ही परिस्थिती सुधारावी.

शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन, पीककर्ज, शेतकरी महाबीज व खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणारे बियाणे लक्षात घेऊन बियाण्यांच्या मागणीचे प्रस्ताव, बियाणे पुरवठा, खतांचे नियोजन, पंतप्रधान पीक विमा योजना आदीबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. 

पडवळ म्हणाले, ‘‘यंदा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी पिकांची आधारभूत किंमत, पीककर्ज दर आणि सध्याची उत्पादकता गृहित धरावी. त्यानुसार उत्पादकतेचा लक्ष्यांक निश्चित करून उत्पादकता साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान प्रसार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

जिल्ह्याचे लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख ७५ हजार हेक्टर आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या लागवड क्षेत्रामध्ये सुमारे १० टक्के वाढ अपेक्षित अाहे. त्यानुसार एकूण ६ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पीकनिहाय शेतीशाळा होतील. यंदा ३ लाख ५६ हजार २५३ आरोग्य पत्रिका वितरण, त्यानुसार खतांच्या वापराविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. उत्पादन खर्च कमी करून सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, यांत्रिकीकरण आदी उपाययोजनांवर भर देण्यात येईल.

चांगले बाजारभाव मिळण्यासाठी गोदाम पावती योजना, शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांमार्फत करार करून शेतीमाल विक्रीसाठी चालना, पीक व फळपीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या सहभागास चालना देण्यात येईल. द्राक्ष पिकाचा उत्पादन खर्च कमी करून निर्यातक्षम उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन व कांदा साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...