आश्‍वासनानंतर ‘स्वाभिमानी’चे उपोषण मागे

आश्‍वासनानंतर ‘स्वाभिमानी’चे उपोषण सुटले
आश्‍वासनानंतर ‘स्वाभिमानी’चे उपोषण सुटले

बुलडाणा : शेगाव तालुक्यातील १५१६ तूर उत्पादक शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करावीत, दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, दुष्काळामुळे शेतकऱ्यांना रोख मदत करावी आदी मागण्यांसाठी तहसील समोर ‘स्वाभमानी’च्या कार्यकर्त्यांचे २६ डिसेंबरपासून उपोषण सुरू होते. याकडे दुर्लक्ष झाल्याने मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. गुरुवारी (ता. ३) या आंदोलनकर्त्यांना आश्‍वासन मिळाल्याने तूर्त उपोषण स्थगित करण्यात आले.

गुरुवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेगाव येथे उपोषण मंडपाला भेट दिली. प्रशासनाकडून कुठलाही तोडगा काढल्या जात नसल्याने रोष व्यक्त करीत उपोषणकर्ते थेट बुलडाणा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. सुरवातीला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना गेटवरच अडविण्यात आले. मात्र परिस्थिती चिघळण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासनाने चर्चेची तयारी दाखवली. या ठिकाणी प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी चर्चेसाठी आले.

 आदोलनकर्त्यांनी शेगाव तालुक्यातील वगळलेल्या १५१६ शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश करावा ही मागणी रेटून धरली. ऑनलाइनच्या गोंधळात या शेतकऱ्यांची नावे यादीत येऊ शकलेली नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. अशा परिस्थितीत न्याय मिळावा यासाठी उपोषण सुरू होते. या प्रमुख्य मागणीला जिल्हा प्रशासनाने हिरवी झेंडी दाखवीत आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com