Agriculture news in Marathi, After dramatic events, the standing Committee is vacated | Agrowon

पुणे : नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीचे पद रिक्त
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या रिक्त पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने नाट्यमय पेचप्रसंग उभा राहिला. त्यामुळे स्थायीचे हे पद रिक्त ठेवण्याचा आणि आचारसंहितेनंतर पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी घेतला.

पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या रिक्त पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने नाट्यमय पेचप्रसंग उभा राहिला. त्यामुळे स्थायीचे हे पद रिक्त ठेवण्याचा आणि आचारसंहितेनंतर पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी घेतला.

कॉंग्रेसच्या सदस्या श्रीमती रत्नप्रभा पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या स्थायी समितीच्या एका पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी कॉंग्रेसकडून अंकिता पाटील आणि दत्ता झुरंगे यांनी अर्ज दाखल केला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीत माघार घेण्यासाठी वेळ दिला. मात्र, मुदतीत काँग्रेसच्या अंकिता पाटील आणि दत्ता झुरंगे निवडणुकीतून माघार घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी मतदान घेण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, अचानक दोघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सभागृहापुढे पेच निर्माण झाला. शेवटी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया थांबविली. या आधीही कॉंगेसमधील अंतर्गत वादामुळे २२ ऑगस्ट रोजीची सभा तहकूब करण्यात आली होती, आता नाट्यमय घडामोडीने सदस्य पदाची निवडणूक लांबणीवर पडली असून, 
पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.  

झुरंगे यांनी मी काँग्रेसमधील एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य झालो आहे. मी कॉंग्रेचा तळागाळातील कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्णयानुसारच मी निवडणुकीत उभा राहिलो आहे. मला राजकीय वरदहस्त नसल्याने घराणेशाही टाळत मला उमेदवारी मिळावी यासाठी सभागृहानेच मला न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी सभागृहाला केले. 

तोडगा निघत नसल्याने अखेर अंकिता पाटील यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र त्यांनी अध्यक्षांना दिले. पाटील म्हणाल्या, माझ्या आजीच्या जागेवर मी निवडून आले. मी सर्वात लहान सदस्य आहे, तसेच या माध्यमातून मला तरुण मुलींचे आणि महिलांचे प्रश्न मांडायचे होते. पण, माझ्या राजकीय जीवनाच्या सुरवातीलाच राजकारण होत असल्याने मला याचे दुख: होत आहे. यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे.

इतर बातम्या
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...