कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिके

खरीप हंगामात कपाशी पिकांची परिस्थिती नाजूक झाली. म्हणून काढणी करून उपलब्ध पाण्यावर रब्बीची पेरणी जास्त प्रमाणात झाली. केली गेली. पाणीसाठा कमी झाला म्हणून काही पिकांना फटका बसण्याची शक्‍यता आहे. - मुरलीधर पाटील, शेतकरी, जानवे (जि. जळगाव) शेतकरी पीक आणि पाणी यांचे नियोजन करीत नसल्यामुळे रब्बीतील काही पिकांना पाण्याअभावी फटका बसण्याची शक्‍यता आहे. - दिनेश पाटील, शेतकरी, कावपिंप्री.
After four years in Kawapimpri crop in good condition
After four years in Kawapimpri crop in good condition

कावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह इंद्रापिंप्री, जानवे, सुमठाणे परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने जलपातळी वाढली. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रब्बी हंगामाला मुकणाऱ्या बळिराजाच्या शिवारात यंदा रब्बी पिके डोलू लागली आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचे हरभरा व गव्हाचे पीक पक्व स्थितीत असल्याने समाधानाचे चित्र पहावयास मिळत आहे. 

परिसरात एकही मोठी नदी अथवा सिंचनासाठी प्रकल्प नसल्याने केवळ मोसमी पावसावर शेती अवलंबून आहे. कावपिंप्रीसह लगतच्या गावांमध्ये जलयुक्तची काम झाली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून अल्पपाऊस झाल्यामुळे जेमतेम खरीप हंगाम येत होता. त्यातही उत्पादन खर्चापेक्षा हातात येणारे उत्पन्न कमी येत होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत होते. उन्हाळ्यात तर पाणी टंचाईची भीषण स्थिती झाल्याने पाण्यासाठी भटकंती करावी  लागत होती. 

मात्र, वरुणराजाने परिसरात यंदा सुरुवातीपासून जोरदार हजेरी लावल्याने गेल्या अनेक वर्षांत प्रथमच परिसरातील लहानमोठे नाले हिवाळ्यातही प्रवाहित होते. खरिपात अतिवृष्टीने झालेले नुकसान काही प्रमाणात रब्बी हंगामात भरून निघणार आहे. परिसरात मका, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, भुईमूग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे.

शेतकऱ्यांना पाणीपातळीची चिंता 

परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने डिसेंबर व जानेवारी महिन्यांत मोठ्या प्रमाणावर जलसाठा दिसत होता. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी रब्बीचे पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या. मात्र, काही ठिकाणी जलपातळी अपेक्षेपेक्षा लवकर घटल्याने अनेक शेतकऱ्यांना उशिरा पेरणी केलेल्या पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी कमी पडण्याची शक्‍यता निर्माण आल्याने चिंता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com