Agriculture news in marathi; After the monsoon rains in Nashik district disrupted three lakh hectare area | Agrowon

नाशिक जिल्ह्यात मान्सूनोत्तर पावसामुळे तीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

नाशिक : मान्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे. लागवडीखालील एकूण ७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकूण साडे चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. द्राक्ष आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, इतर पिकेही संकटात आली आहेत. 

नाशिक : मान्सूनोत्तर पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला आहे. लागवडीखालील एकूण ७ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकूण साडे चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. द्राक्ष आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, इतर पिकेही संकटात आली आहेत. 

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नुकसानीची पातळी वाढली. यात सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा प्रशासकाच्या आदेशानुसार यंत्रणा शेतीच्या नुकसानीसंबंधीत पंचनाम्याच्या कामाला सुरवात झाली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. सर्वात जास्त नुकसान मालेगाव तालुक्यात जिरायती, बागायती व फळपिकांचे झाले आहे. पेठ तालुक्यात नुकसान नसल्याचा कृषी विभागाची माहिती कृषी विभागाने प्राथमिक अहवालात नमूद केली आहे. सर्वात जास्त फटका मका, सोयाबीन या खरीप पिकांना तर फळपिकांमध्ये सर्वात जास्त फटका द्राक्ष बागांना बसला आहे. 

आत्तापर्यंत नुकसानीचे १८% पंचनामे पूर्ण 
नाशिक जिल्ह्यात पंचनामे सुरू झाले असून सोमवार (ता. ४) पर्यंत ४ लाख ५६ हजार ९३१ हेक्टर बाधित क्षेत्रापैकी ८० हजार ८१० हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याचा माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ १८ टक्के क्षेत्रावर पंचनामे पूर्ण झाले आहेत.

जिल्ह्यातील नुकसान असे 

  • बाधित गावे  :  १६२१
  • एकूण शेतकरी  :   ४५६९३१
  • एकूण बाधित क्षेत्र  :  ३०४५६२ . ८५

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...