Agriculture news in marathi; After the rain break in Akola district, strike again | Agrowon

अकोला जिल्ह्यात पावसाचा विश्रांतीनंतर पुन्हा तडाखा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अकोला  ः या भागात तीन ते चार दिवसांची विश्रांती घेत मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडविली. शुक्रवारी (ता.८) अकोट तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहिले. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने कपाशीचे पीक अनेक शेतांमध्ये जमिनीवर आडवे झाले आहे. सखल भागात पिकात ठिकठिकाणी पाणी साचले. शिवाय अकोट-अंजनगाव मार्गावर पणज परिसरात पुलावरून पाणी वाहल्याने वाहतुक काही काळ बंद झाली होती.

अकोला  ः या भागात तीन ते चार दिवसांची विश्रांती घेत मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडविली. शुक्रवारी (ता.८) अकोट तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहिले. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने कपाशीचे पीक अनेक शेतांमध्ये जमिनीवर आडवे झाले आहे. सखल भागात पिकात ठिकठिकाणी पाणी साचले. शिवाय अकोट-अंजनगाव मार्गावर पणज परिसरात पुलावरून पाणी वाहल्याने वाहतुक काही काळ बंद झाली होती.

गेल्या तीन-चार दिवसांपासून या भागात पावसाचा जोर ओसरला होता. यामुळे शेतांमधील कामे वेगाने सुरु झाली होती. सोयाबीन मळणी, ज्वारीची सोंगणी तसेच कापूस वेचणीच्या कामांना वेग आला होता. रब्बीसाठी शेतीची मशागतही शेतकरी करण्याकडे वळू लागला असतानाच गेल्या २४ तासात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री बुलडाणा, मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी अकोट, तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याला लागून असलेल्या गावांमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसासोबतच वादळी वारा सुद्धा झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे अकोट परिसरातील अनेक शेतांमधील पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. केळीसह संत्रा या फळपिकाचे सुद्धा नुकसान झाले. सलग तीन तास झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पाणी वाहले. वेचणीला आलेला कापूस मोठ्या प्रमाणात ओला झाल्याने शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...