Agriculture news in marathi; After rest, heavy rains again in Solapur | Page 2 ||| Agrowon

विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी (ता. १८) मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा सर्वदूर हजेरी लावली. पण त्यात फारसा जोर नव्हता. जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा अशा बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २६.११ मिलिमीटर इतका पाऊस झाला. 

सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी (ता. १८) मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा सर्वदूर हजेरी लावली. पण त्यात फारसा जोर नव्हता. जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा अशा बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २६.११ मिलिमीटर इतका पाऊस झाला. 

शुक्रवारी दिवसभर दमट वातावरण होते. सायंकाळनंतर मात्र मोठ्याप्रमाणात ढग दाठून आले. रात्री नऊच्या सुमारास अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास मात्र त्याने चांगलाच जोर लावला. पण तो काही मिनिटांसाठीच राहिला. पण समाधानाची बाब म्हणजे या पावसाने जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा सर्वदूर भागात हजेरी लावली. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात अधून-मधून पाऊस पडतो आहे. पण त्यात जोर नाही.

शुक्रवारी, मात्र पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. विशेषतः मोहोळ, माढा, पंढरपूर, करमाळा भागात त्याचा जोर चांगला राहिला. माढ्यात सर्वाधिक ४८.६० मिलिमीटर, मोहोळला ४३.१९ मिलिमीटर पाऊस झाला. त्या खालोखाल करमाळ्यात ३१ मिलिमीटर पाऊस झाला. बाकीकडे १० ते २१ मिलिमीटर दरम्यान बऱ्यापैकी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी २६.११ मिलिमीटर तर जिल्ह्यातील एकूण ९१ मंडलाचा विचार करता या सर्व मंडलात सरासरी २६.३९ मिलिमीटर पाऊस झाला. शनिवारी पुन्हा कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण होते, शिवाय प्रचंड उकाडाही जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्‍यता होती.

विजेच्या धक्‍क्‍याने चुलत्यासह पुतण्याचा मृत्यू
शुक्रवारी मध्यरात्री अचानकपणे पावसाने जोर धरला. यात खुपसंगी (ता. मंगळवेढा) येथे विजेच्या धक्‍क्‍याने चुलत्यासह पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पावसाचा आवाज आणि त्याच्या जोराने गोठ्यातील शेळ्या ओरडू लागल्याने तुकाराम सोमा चौगुले (वय ६०) हे घराशेजारील गोठ्यात शेळ्यांना पाहायला गेले आणि त्यांना विजेचा शॉक बसला, ते जागेवरच कोसळले. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांकडून एकच आरडाओरड सुरू झाली. हा आवाज ऐकून त्यांच्या शेजारीच राहणारा त्यांचा पुतण्या सोमा दगडू चौगुले (वय ४५) हाही धावत चुलता तुकाराम यांना बाहेर काढण्यासाठी गोठ्यात शिरला. तेव्हा सोमा चौगुले (वय ४५) यांनाही विजेचा शॉक बसल्याने चुलत्या-पुतण्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर गोठ्यातील दहा शेळ्याही मृत्यूमुखी पडल्या. या घटनेनंतर गावात एकच शोककळा पसरली.


इतर ताज्या घडामोडी
वीजबिल माफ करा, अन्यथा असहकार आंदोलन ः...बुलडाणा ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे...
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊसअकोला ः गेल्या २४ तासांपासून वऱ्हाडात पावसाची झड...
नांदुरा तालुक्यातील ‘त्या’ कृषी...बुलडाणा ः या हंगामात चार शेतकऱ्यांच्या नावावर...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची...रत्नागिरी ः संततधार पावसाने सोमवारी (ता. १०)...
उडीद पिकावर किडींचा हल्लाबोलरोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : जिल्ह्यात सततच्या...
कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय...लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...