नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरू

स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाल्यानंतर नाशिक बाजार समितीचे कामकाज आज (ता.२९) पासून सुरू होणार असल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली.
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरू
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरू

नाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाल्यानंतर नाशिक बाजार समितीचे कामकाज आज (ता.२९) पासून सुरू होणार असल्याची माहिती सचिव अरुण काळे यांनी दिली.

नाशिक बाजार समितीच्या पंचवटी मुख्य बाजार आवारात कोरोनासंक्रमित दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व बाजार समिती परिसर निर्जंतुक करण्यासाठी बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार २६ ते २८ मे दरम्यान ३ दिवस बंद होते. अखेर स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यात आली आहे.

बाजार समितीचे व्यापारी,हमाल व मापारी वर्गाच्या संचालकांच्या अर्जावरून बाजार समिती प्रशासनाने हा निर्णय घेऊन पंचवटी मुख्य बाजार आवार व पेठ रोडवरील शरदचंद्र पवार बाजार आवारातील कामकाज बंद होते. अखेर खबरदारी घेऊन पुन्हा बाजार समितीतील सर्व व्यवहार आजपासून सुरळीत होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com