बंगल्यासमोर ठिय्या मारल्यानंतर फडणवीसांनी दिली भेट

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते.
बंगल्यासमोर ठिय्या मारल्यानंतर फडणवीसांनी दिली भेट After sitting in front of the bungalow, Fadnavis gave a gift
बंगल्यासमोर ठिय्या मारल्यानंतर फडणवीसांनी दिली भेट After sitting in front of the bungalow, Fadnavis gave a gift

नाशिक  : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र शिष्टमंडळास फडणवीस यांच्या कार्यालयाकडून भेट नाकारण्यात  आली.

यावर शिष्टमंडळाने आक्रमक होत त्यांच्या बंगल्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर त्यांचे कार्यालय खडबडून जागे झाले अन् त्यानंतर कांदा उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फडणवीस यांनी भेट दिल्याची माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली. 

कांद्याच्या उत्पादन खर्चावर रास्त दर मिळण्यासाठी निर्यात बंदी तत्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. १५) मुंबई येथे संघटनेच्या  शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अवर सचिव अजय चौधरी यांना भेटून लेखी पत्र देऊन मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com