थोरातांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर संगमनेरमध्ये जल्लोष 

 After Thorata took the oath of office Glory in the Sangamner
After Thorata took the oath of office Glory in the Sangamner

नगर ः मुंबईत शिवतीर्थावर झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर येथे थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

मुंबईतील शपथविधीच्या कार्यक्रमासाठी येथील कॉंग्रेस व शिवसेनेचे तालुक्‍यातील जवळपास सर्व स्थानिक नेते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईत गेले होते. शपथविधी सोहळा सर्वांना पाहण्यासाठी थोरात यांच्या संगमनेरमधील ‘यशोधन’ या मध्यवर्ती संपर्क कार्यालयासमोर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था केली होती. यशोधन कार्यालय, थोरात यांचे निवासस्थान विद्युतरोषणाईने नटले होते. शपथविधी पाहण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी, थोरात यांची शपथ सुरू असतानाच फटाक्‍यांची आतषबाजी करीत शहर दणाणून सोडले. फटाक्‍यांची आतषबाजी सुमारे अर्धा तास सुरू होती. 

गायक अवधूत गुप्ते यांनी थोरात यांच्या निवडणूक प्रचारासाठी केलेल्या खास गाण्यावर, तसेच ढोल-ताशांच्या गजरात युवक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. थोरात यांनी अडचणीच्या काळात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना, महाविकास आघाडी स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. कॉंग्रेसच्या गटनेतेपदी निवड तसेच यापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष, हिमाचल व गुजरातचे निरीक्षक, यांसह राष्ट्रीय वर्किंग कमिटीत कायमस्वरूपी सदस्य, अशा महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. 

मागील कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण, अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. या वेळी उपमुख्यमंत्रिपदासाठीच त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात त्यांचा समावेश झाल्याने, संगमनेर तालुक्‍यात सर्वत्र गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. 

बसस्थानक परिसरात धर्मवीर संभाजी तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष सतीश आहेर यांनी स्वखर्चाने मोठा स्क्रीन लावून शपथविधी पाहण्याची व्यवस्था केली होती. शपथविधीनंतर बसस्थानक चौक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी झाली. २०१४नंतर पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संगमनेरला मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदामुळे आनंद साजरा केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com