Agriculture news in Marathi, After the victory, Rohit Pawar goes directly to Ram Shinde's house | Agrowon

विजयानंतर रोहित पवार थेट राम शिंदेच्या घरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

नगर ः विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निवडून आलेले उमेदवार आपल्या विरोधकांना कसे अस्मान दाखवले हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रोहित पवार यांनी मात्र दिग्गज मंत्र्याला पराभूत केल्यानंतरही विजयोन्माद न करता सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले. विजयानंतर रोहित पवार थेट पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांचे व त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद घेतले. शिंदे यांनीही पवार यांचे फेटा बांधून स्वागत केले. राज्यभर या अनोख्या सुसंस्कृत राजकारणाची चर्चा होत आहे. 

नगर ः विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निवडून आलेले उमेदवार आपल्या विरोधकांना कसे अस्मान दाखवले हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या रोहित पवार यांनी मात्र दिग्गज मंत्र्याला पराभूत केल्यानंतरही विजयोन्माद न करता सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले. विजयानंतर रोहित पवार थेट पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांचे व त्यांच्या मातोश्रीचे आशीर्वाद घेतले. शिंदे यांनीही पवार यांचे फेटा बांधून स्वागत केले. राज्यभर या अनोख्या सुसंस्कृत राजकारणाची चर्चा होत आहे. 

राज्य सरकारमध्ये प्रमुख मंत्री, नेते असलेले राम शिंदे यांच्याशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची लढत होत असल्याने राज्याच्या प्रमुख लढतीत कर्जत-जामखेडकडे लक्ष लागलेले होते. येथे झालेल्या सरळ लढतीत मंत्री राम शिंदे यांना पराभूत व्हावे लागले. विजयी झाल्यानंतर विजयोन्माद साजरा करताना निवडून आलेले विरोधकांना कसे लोळवले याचे वर्णन करतात याचाच सहसा अनुभव आहे. मात्र, रोहित पवार यांनी विजयोन्माद न करता विजयानंतर थेट राम शिंदे यांचे घर गाठून आपल्या सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले. 

गुरुवारी दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर रोहित यांनी कर्जतहून जामखेडकडे जाताना चौंडी येथे पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकरांचे दर्शन घेतले. त्यानंतर रोहित यांनी आपल्या मातोश्री सुनंदा यांच्यासह थेट पालकमंत्री शिंदे यांचे निवासस्थान गाठले. घरी आलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचे पालकमंत्री शिंदे यांनीही उत्साहात स्वागत केले. ‘‘की विकासासाठी कटिबद्ध आहे. विकासाबाबत सर्व कार्यकर्त्यांनीही भांडण न करता एकत्र राहावे’’, अशी अपेक्षाही आहे. मंत्री शिंदे यांनी विजयी उमेदवार रोहित यांचा फेटा बांधून सत्कार केला. या मतदारसंघात विजयी उमेदवार पराभूत उमेदवाराच्या घरी जाऊन भेट घेण्याचा हा पहिला प्रसंग अनेकांनी अनुभवला. 

रोहित पवारांनी दाखविलेला सुसंस्कृतपणाचा राज्यात चर्चेचा विषय ठरला. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होण्याचे अनेक प्रसंग घडतात. येथे मात्र झाला स्नेहाचा सोहळा झाला. कर्जत-जामखेडमधील अनोखा सोहळा संपूर्ण राज्यभर सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चिला जात आहे. 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...