केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात एरंडगावात ‘प्रहार’चे मुंडन आंदोलन

नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या शिफारसीवरून कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला.
Against the Centre's onion export ban 'Prahar' shaving movement in Erandgaon
Against the Centre's onion export ban 'Prahar' shaving movement in Erandgaon

नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या शिफारसीवरून कुठलीही शहानिशा न करता अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्याद्वारे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा गळाच दाबला आहे. या  निर्णयाविरुद्ध  गुरुवारी (ता.१७) येवला तालुका प्रहार संघटनेच्या वतीने एरंडगाव येथे केंद्र शासनाच्या विरोधात मुंडन आंदोलन करण्यात आले. पिंडदान करत सरकारचे श्राद्ध घालण्यात आले.

केंद्रीय अन्न व पुरवठा राज्यमंत्री रावसाहेव दानवे हे  केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा डांगोरा पिटत असतात. आता त्यांनीच ही मनमानी करून कांदा उत्पादकांना अडचणीत आणले आहे. राज्यातील कांदा उत्पादकांच्या थेट पोटावरच वार करून आम्ही शेतकऱ्यांप्रती  किती असंवेदनशील आहोत, याचा पुरावाच निर्यात बंदी करून दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे, संघटक किरण चरमळ, शंकर गायके, वसंत झांबरे, पांडुरंग शेलार, जगदीश गायकवाड, रामभाऊ नाईकवाडे, गणेश लोहकरे, सचिन पवार, शिवाजी निकम, भागवत भड, सागर गायकवाड, कलीम पटेल, गोरख निर्मळ, संजय मेंगाने, माहेबूब शेख, दत्तू बोरणारे आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.

 सरकारला जर कांदा उत्पादकांच्या अडचणी समजत नसतील, तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली लवकरच गनिमी काव्याने दिल्लीत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निर्यात बंदी म्हणजे ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, अशी अवस्था झाली. याबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. या नंतर शासनाने हा अन्यायकारक निर्णय मागे न घेतल्यास या पुढे कुठलीही पूर्व सूचना न देता आंदोलन तीव्र करण्यात येईल.  - हरिभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष, प्रहार, येवला  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com