कारंजात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करणाऱ्या तहसिलदारांना दमदाटी

वाशीम: सध्याचा परिस्थितीचा फायदा उठवत वाळू माफिया सक्रीय झाला आहे. एवढेच नव्हे, तर या तालुक्यात थेट अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ट्रक मालकास अटक केली. मात्र, अद्यापही दुसऱ्या आरोपिविरुद्ध कडक कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल यंत्रणेने या प्रकरणी दोषीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.
Against illegal sand transportation in the fountain Tehsildars taking action
Against illegal sand transportation in the fountain Tehsildars taking action

वाशीम : सध्याचा परिस्थितीचा फायदा उठवत वाळू माफिया सक्रीय झाला आहे. एवढेच नव्हे, तर या तालुक्यात थेट अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ट्रक मालकास अटक केली. मात्र, अद्यापही दुसऱ्या आरोपिविरुद्ध कडक कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल यंत्रणेने या प्रकरणी दोषीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. 

तालुक्यात शासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करीत असताना वाळू माफिया सक्रीय झालेला आहे. अत्यावश्यक सेवेच्या पासेस काढून वाळूची वाहतुक सुरु केली आहे. अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार १९ मे रोजी कारंजात समोर आला. यवतमाळ जिल्हयातून शहरातील छुप्या मार्गाने वाळू आणली जात असल्याची माहिती तलाठ्यांना मिळाली होती. याची चौकशी झाली असता कारंजामध्ये मेमन कॉलनी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून वाळू खाली केली जात असल्याचे दिसून आले. 

दरम्यान, तहसिलदार धीरज मांजरे, नायब तहसिलदार विनोद हरणे व तलाठी संदिप गुल्हाने यांच्यासह महसुल विभागाचे अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चौकशी केली असता ट्रकचालक मो. सलिम हासमानी या मालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. तर, ट्रकच्या दर्शनी भागावर फळे, भाजीपाला, राख व जळाऊ लाकूड वाहतूक करण्याचा परवाना चिकटवल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात या ट्रकमध्ये अवैध वाळू वाहतुक करीत असल्याचे समोर आले. तर, ट्रकचा समोरील व मागील बाजूस वेगवेगळा नंबर मिळून आला. कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत हुज्जतबाजी घालण्यात आली. मांजरे यांचे कपडे फाडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. 

या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २० मे रोजी कारंजा पोलिसात अधिकाऱ्यांनी फिर्याद. ट्रकमालक मो. सलीम अब्दुल मजीद हासमानी यांनी हुज्जतबाजी करून तर, मनोज काळे याने फोनवरुन कारवाई दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असे म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com