Agriculture news in marathi Against the insurance company Anger among farmers | Page 3 ||| Agrowon

विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतीपिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून ५६ हजारांवर विमाधारकांपैकी अवघ्या ४१०० शेतकऱ्यांना विमाभरपाई मंजूर केली आहे.

गोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतीपिकांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून ५६ हजारांवर विमाधारकांपैकी अवघ्या ४१०० शेतकऱ्यांना विमाभरपाई मंजूर केली आहे. ही भरपाई अवघ्या काही लाखांच्या घरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये कंपनी विषयी रोष व्यक्त होत आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यातील ५६६४० शेतकऱ्यांनी २८ हजार ९१५ हेक्टरमधील पिकांचा विमा उतरविला होता विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी दोन कोटी दोन लाख रुपयांचा हप्ता भरला. नैसर्गिक आपत्ती काळात झालेल्या नुकसानीची भरपाई या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र व्यावसायिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाईच्या मुद्द्यावर ठेंगा दाखविण्यात आला आहे.

खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदी काठावरील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने आणि भागात जमीन खरडून गेली वाळूचे थर शेतात पसरल्याने ही जमीन बहुतांशी नापेर झाली आहे. त्यानंतरच्या काळात पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. बऱ्याच शेतकऱ्यांना लागवड खर्च भरून काढणे कठीण झाले पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिली पण या कंपनीने यासाठी तीन वेगळे निकष लावत त्या आधारावर शेतकऱ्यांना भरपाईसाठी पात्र ठरविले, त्यामुळे हजारो विमाधारक भरपाईपासून वंचित राहिले आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात परतीचा पाऊस आणि कीड रोगामुळे अंदाजे ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विमा कंपनीने मात्र ५६६४० शेतकऱ्यांपैकी केवळ सहा हजार ८४० तक्रारदार शेतकऱ्यांपैकी ४१०० शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरविले आहे. वीस हजारांवर शेतकऱ्यांनी नुकसान होऊन देखील तक्रार न केल्याने त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मिळाली अवघी ६१ लाख भरपाई
शेतीपिकाचे नुकसान झाल्यावर विमा कंपनीला ७२ तासांत कळवावे लागते. याअंतर्गत तक्रार केलेल्या शेतकऱ्यांपैकी ४६९० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यापैकी ४१०० शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही भरपाई केवळ ६१ लाख रुपयांची आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...