नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
पारनेर : महावितरणच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर
विहिरीत पाणी असूनही पिकांना ते विजेअभावी देता येत नाही. त्यामुळे आम्हाला वीज तरी द्या, अन्यथा फाशी तरी, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत निघोज येथील शेतकऱ्यांनी विजेसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
निघोज, ता. पारनेर : विहिरीत पाणी असूनही पिकांना ते विजेअभावी देता येत नाही. त्यामुळे आम्हाला वीज तरी द्या, अन्यथा फाशी तरी, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत निघोज येथील शेतकऱ्यांनी विजेसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता कन्हैयालाल ठाकूर यांनी, तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती.
महावितरणकडून वीजबिल वसुलीच्या नावाखाली मागील तीन-चार दिवसांपासून निघोजसह वडनेर, पठारवाडी, देवीभोयरे, मोरवाडी आदी गावांतील कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. महावितरणच्या या हुकूमशाहीविरोधात निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. २६) सकाळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपकेंद्रात ठिय्या दिला. शाखा अभियंत्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी कार्यालयाजवळील निघोज- देवीभोयरे रस्त्यावर ठिय्या दिला. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली.
या वेळी अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने नगरचे मुख्य कार्यकारी अभियंता कन्हैयालाल ठाकूर यांनी घटनास्थळी येत शेतकऱ्यांशी चर्चा केली, तसेच वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
- 1 of 1096
- ››