आगर परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

आगर परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
आगर परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

आगर, जि. अकोला ः उशीरा आलेला पाऊस, बियाण्यांची खरेदी, शेतीला लागणारे खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणींमध्ये आलेला असताना पेरणी केल्या कपाशीच्या कोवळ्या अंकुरांना वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत फस्त केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असूून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.

ग्रामीण भागातील जनतेची संपूर्ण अर्थव्यवस्था किमान शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेती शिवाय शेतकऱ्याला कुठलाच पर्याय नाही. दरवर्षी निसर्ग शेतकऱ्यांच्या जिवावर उठतो तर कधी नापिकी होत असल्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोझाखाली दबून आत्महत्या करतो. शासनाच्या तुटपुंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना अनेकवेळा बॅंकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. एवढे करून सुद्धा आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित राहतात. 

कुठून तरी पैशाची जुळवाजुळव करून शेती मशागतीची कामे शेतकरी करतो. त्यात पावसाचा लहरीपणा. यंदा माॅन्सूनपूर्व पावसाने दांडी मारली त्यामुळे जमीन ओली झाली नाही. त्यात मॉन्सूनपूर्व लागवड केलेल्या कपाशीवर मॉन्सूननंतर कोवळे अंकूर फुटायला लागले तोच वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत हे अंकूर फस्त केले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून उत्पादनावर परिणाम होणार आहे. आगर शेतशिवारामध्ये वन्यप्राण्यांचा संचार वाढला आहे. 

या भागात हरिण, काळवीट, रानटी डुक्कर, माकड मोठ्या संख्येने वावरतात. हे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी करत असून त्यांच्या संपर्कात एखादा शेतकरी वा शेतमजूर आल्यास त्यासही जखमी करतात. वन्यप्राण्यांच्या धास्तीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरतात. नुकतेच उगवलेले कपाशी अंकूर प्राण्यांनी फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेवर व उत्पन्नावर मोठ्या परिणाम होणार असून या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी आर्त मागणी वनविभागाकडे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

वडिलोपार्जित ११० एकर कोरडवाहू शेती असून ज्वारी, मुंग, उळीद, तूर आदी काहीच वन्यप्राण्यांनी शेतामध्ये ठेवले नाही. या वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा. - अनिल काळणे, शेतकरी आगर. 

शेतातील नेमकेच आलेले अंकूर परिसरात वावरणाऱ्या वन्यप्राण्यांनी शेतामध्ये धुमाकाळ घातला आहे. यामुळे    - राजेंद्र तेलगोटे, शेतकरी, नवथळ

आधीच पाऊस उशीरा आला त्यात उगवलेल्या अंकूरांना वन्यप्राण्यांनी खाल्लामुळे शेतामध्ये उत्पादनात घट होणार आहे.  - अभिमन्यू वक्टे, शेतकरी, पाळोदी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com