Age condition for corona vaccine should be relaxed: Raju Shetty
Age condition for corona vaccine should be relaxed: Raju Shetty

कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल करावी ः राजू शेट्टी 

भाजीपाला, दूध उत्पादक तसेच विक्रेत्यांना कोरोना व्हॅक्सिनसाठी लावलेली वयाची अट शिथिल करून त्वरीत सर्वांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच विक्रेत्यांना कोरोना व्हॅक्सिनसाठी लावलेली वयाची अट शिथिल करून त्वरीत सर्वांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

श्री. शेट्टी यांनी पत्रात म्हंटले आहे की, राज्यासह देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. महाराष्ट्रात १५ दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील साथीच्या आजाराबद्दलची भीती आपल्याला माहीत असेलच. या कालावधीत सर्व नागरिकांना भाजीपाला व दुधासारख्या शेती मालाचा सतत व अखंड पुरवठा कायम ठेवण्यात शेतकरी महत्त्वाची भूमिका निभावतात. अलीकडे लॉकडाउन परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन दूध व भाजीपाल्याच्या पुरवठ्यात गुंतलेल्या लोकांच्या हालचालींना परवानगी देत नाही किंवा त्यावर मर्यादा आणत नाही. यातील बहुतेक ४५ वर्षांखालील लोक आहेत. 

भाजीपाला आणि दुधाच्या वाहतुकीचे काम करीत असलेल्या शेतकरी कुटुंबातील आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लस केवळ ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाते. या लोकांना जास्त धोका असल्याने ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या या लोकांना लसी देण्याची परवानगी द्या. जेणेकरून दूध आणि भाज्यांचा चक्रीय पुरवठा थांबू नये आणि या लोकांची आर्थिक स्थिती देखील बंद होणार नाही व्हॅक्सिनसाठी महाराष्ट्रातील संबंधित विभागाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी यावेळी केली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com