Agriculture news in Marathi Agenda Task list for agricultural officers in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांसाठी बनविली कार्यसूची

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

अकोला ः ‘कोरोना’मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने संपूर्ण कामकाज ठप्प पडलेले आहे. अशा स्थितीत आगामी हंगामाच्या दृष्टीने तयारी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने मार्ग काढण्याचे ठरवीत प्रत्येक अधिकाऱ्याला आपापल्या कार्यक्षेत्रातील खरीप हंगाम २०२० ची पूर्व तयारी नियोजन व अंमलबजावणीचे काम करण्याचे सुचविले आहे. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काळजी घेतानाच हे काम टप्प्याटप्प्याने ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी कार्यसूची दिल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.  

अकोला ः ‘कोरोना’मुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने संपूर्ण कामकाज ठप्प पडलेले आहे. अशा स्थितीत आगामी हंगामाच्या दृष्टीने तयारी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने मार्ग काढण्याचे ठरवीत प्रत्येक अधिकाऱ्याला आपापल्या कार्यक्षेत्रातील खरीप हंगाम २०२० ची पूर्व तयारी नियोजन व अंमलबजावणीचे काम करण्याचे सुचविले आहे. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काळजी घेतानाच हे काम टप्प्याटप्प्याने ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी कार्यसूची दिल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.  

सद्यःस्थितीत प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या कृषी मालाच्या विक्रीबाबत मार्गदर्शन करावे. फळांची, भाजीपाल्याची नगर पंचायत, नगर पालिका, महानगर पालिका कार्यक्षेत्रात तातडीने विक्री व्यवस्था उभी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत ठिकाणे निश्‍चित करावेत. अधिकृत कृषी माल विक्रीचे परवानगी प्रमाणपत्र, ओळखपत्र वितरित करणे, शेतकऱ्याला हव्या असलेल्या परवानग्या मिळवून देणे, जिल्ह्यातील खते, बियाणे, औषधी उत्पादन कंपनी, परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. 

आगामी हंगामासाठी खते, बियाणे, औषधांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी घाऊक विक्रेते व वितरकांकडून कंपनीनिहाय बियाणे, खतांचे ग्रेड, औषधांचे प्रकार इत्यादी माहिती घेत वरिष्ठ कार्यालयास सादर करावी. दर दिवशी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा व दिलेल्या सेवेबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाला अहवाल द्यावा. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊऩ कालावधीमध्ये उपविभागीय, तालुका तसेच मंडळ स्तरावर नियंत्रण कक्षाचे काम सुरू आहे किंवा नाही याचा अहवाल, शेतकऱ्यांना शेती कामासाठी लागणाऱ्या मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामाच्या कालावधीसाठी ओळखपत्र देण्याबाबत कृषी सहायकांना सूचना देणे, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी मूळ मुख्यालयी राहतात किंवा नाही याबाबत वेळोवेळी सरपंचांकडून खात्री करून घ्यावी, खरीप हंगामाचे नियोजन करून अंमलबजावणीला सुरुवात करावी.

३८ प्रकारची कार्यसूची
कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात बीजप्रक्रियेचे महत्त्व व फायदे, घरचे सोयाबीन बियाणे म्हणून वापर करणे, कापूस बोंडअळी नियंत्रण, कीटकनाशके विषबाधा उपाययोजना, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे महत्त्व व लाभार्थ्यांची निवड करणे, प्रकल्प बनविणे, फळबाग लागवड व वनशेती अभियानामध्ये प्रति कृषी सहायक १० हेक्टर लागवडीसाठी शेतकऱ्यांची निवड करणे, अशा प्रकारच्या ३८ प्रकारची कार्यसूची देण्यात आली आहे. या सूत्रांनुसार प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने कामकाज करण्याचे सुचविण्यात आले आहे.


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...