सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते ३७०५ रुपये

सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते ३७०५ रुपये
सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते ३७०५ रुपये

सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक आहे. मंगळवारी (ता. १२) गुळाची १३३९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ३७०५, तर सरासरी ३२५३ असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली.

राजापुरी हळदीची ६५४५ क्विंटल आवक झाली. हळदीस प्रतिक्विंटल ६३०० ते १११०० तर सरासरी ७८०० रुपये असा दर मिळाला. हरभऱ्याची १३ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४४०० ते ४५००, सरासरी ४४५० रुपये, परपेठ हळदीची ८८८ क्विंटल आवक, तर प्रतिक्विंटल ४५०० ते ८६५०, तर सरासरी ६५७५ असा दर होता. 

विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची २९१४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५० ते ७५०, तर सरासरी ५०० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची ८८५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ९०० तर सरासरी ६०० रुपये असा दर होता. डाळिंबाची ३५५० किलोची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस १०० ते ३६० तर सरासरी २३० रुपये असा दर मिळाला. 

चिकूची ४२० किलोची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १०० ते ३५० तर सरासरी २५० रुपये असा दर मिळाला. कलिंगडाची १२५ डझन आवक झाली. त्यास प्रतिडझनास ३०० ते ७०० रुपये तर सरासरी ५०० रुपये असा दर होता. सफरचंदाची ७४५ पेटीची आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रतिपेटीस ७०० ते १२०० तर सरासरी ९५० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com