कृषी सहायक संघटना मागण्यांसाठी आक्रमक

कृषी सहायकांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करण्यासह आपल्या इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना आक्रमक झाली आहे.
Aggressive to the demands of agricultural support organizations
Aggressive to the demands of agricultural support organizations

औरंगाबाद : कृषी सहायकांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करण्यासह आपल्या इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना आक्रमक झाली आहे. यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना संघटनेने निवेदन दिले असून, मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनाचे टप्पेही ठरविले आहेत.

राज्य कृषी सहायक संघटनेच्या निवेदनानुसार, राज्यातील दहा हजार पाचशे कृषी सहायक कोरोना महामारीमध्ये आपत्ती निवारण करण्यासाठी प्रशासनासोबत चेक पोस्ट, कोविड सेंटर ग्राम पातळीवरील दक्षता समितीमध्ये अहोरात्र काम करीत आहेत. येत्या खरीप हंगामात कृषी सहायक घरच्या सोयाबीन बियाण्याचा वापर, वाणक्षमता तपासणे, बीजप्रक्रिया, रुंद सरी-वरंबा पद्धतीचा वापर, एक गाव एक वाण, खत वापर दहा टक्‍क्‍यांनी कमी करणे, हुमणी नियंत्रण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवड, महाडीबीटी पोर्टलची प्रचार प्रसिद्धी करणे, सूक्ष्म सिंचन कामे मोहीम स्वरूपात करीत आहेत.

तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांना फ्रन्टलाइन वर्कर्स घोषित केले आहे. मग कृषी कर्मचारी यांना का नाही? आतापर्यंत आमचे ७० पेक्षा जास्त कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यापैकी २ लोकांना सानुग्रह अनुदान मिळाले आहे. शासनास विनंती, की कृषी सहायक आणि कृषी अधिकारी यांना फ्रन्टलाइन वर्कर्स घोषित करावे. - अंजना सोनवलकर, उपाध्यक्ष, राज्य कृषी सहायक संघटना

सध्याच्या परिस्थितीत शाळासुद्धा ऑनलाइन सुरू असताना शेतीशाळा घेण्यासाठी गावात जाऊन २५ लोकांना एकत्र करणे धोकादायक आहे. ऑनलाइन कामे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधनसामग्री शासनाकडून पुरवली जात नाही. या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठीही हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. - शिवानंद आडे, उपाध्यक्ष, राज्य कृषी सहायक संघटना

या आहेत मागण्या

  • कृषी सहायकांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषित करावे
  • मृत्युमुखी पडलेल्या सर्व कृषी सहायकांना विनाअट ५० लाखांचे विमा कवच लागू करावे.
  • वयाची अट न ठेवता कृषी सहायकांचे प्राधान्याने लसीकरण करावे
  • जनसंपर्क वाढवणारे विविध कार्यक्रम कोरोना संकटात स्थगित करावे
  • असे आहेत आंदोलनाचे टप्पे

  • २४ ते २६ मे दरम्यान काळ्या फिती लावून कामकाज
  • २८ मे रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन
  • एक ते चार जूनदरम्यान असहकार आंदोलन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com