Agriculture news in Marathi agitates across the country if farmers do not get justice in the budget ः Raju Shetty | Agrowon

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास देशभरात आंदोलन ः राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने शेतकरीविरोधी राहिले आहे. येत्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी संघटनांच्यावतीने देशव्यापी तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. १६) सांगितले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने शेतकरीविरोधी राहिले आहे. येत्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास सर्व शेतकरी संघटनांच्यावतीने देशव्यापी तीव्र आंदोलन उभे केले जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी (ता. १६) सांगितले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

देशभरातील २६५ शेतकरी संघटनांच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारी मंडळाची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या वेळी राजू शेट्टी यांच्यासह योगेंद्र यादव, कॉ. अतुलकुमार अंजान, प्रतिभाताई शिंदे, कविता कुरगुंटी आदी उपस्थित होते.

या वेळी राजू शेट्टी पुढे म्हणाले, की केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने शेतकरीविरोधी राहिले आहे. येत्या काळात केंद्र सरकारचे अर्थसंकल्पी अधिवेशन होणार आहे. याअनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्व घटकांसोबत चर्चा करीत आहेत. पण, त्यांना शेतकरी संघटनांसोबत चर्चा करावीशी वाटत नाही. जाणीवपूर्वक त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

याचा निषेध करुन येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आणि देशातील शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास शेतकरी संघटनांच्यावतीने देशभर तीव्र आंदोलन उभे केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या २६ तारखेला ब्राझीलचे पंतप्रधान देशात येणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत काही करार केले जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील १७ ते १८ राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार असल्याची भीती आहे. केंद्र सरकारचे देशातील साखरेचे दर स्थिर ठेवण्याचे धोरण ब्राझीलच्या गैरसोयीचे आहे, त्यांना आपल्याला साखर निर्यात करता येत नाही. त्यापार्श्वभूमीवर हा करार देशातील शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरले अशी भीती सुद्धा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. योगेंद्र यादव म्हणाले, देश अभूतपूर्व मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेती क्षेत्राचा वृद्धीदर सातत्याने १ ते २ टक्के पर्यंत घटला आहे. गेल्या ८ ते १० महिन्यात केंद्र सरकारने कृषी क्षेत्राला दिलासा देणारा एकही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे केंद्राने येत्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला फोकस करावे तसेच देशातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, यंदा दुष्काळ, महापूरात झालेल्या नुकसानीची मदत मिळालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...