नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन
महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक थकबाकी वसुलीसाठी सक्तीने मोहीम राबविली जात आहे.
परभणी : महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक थकबाकी वसुलीसाठी सक्तीने मोहीम राबविली जात आहे. वीज तोडल्यामुळे पाण्याअभावी पिके हातून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महवितरण कंपनीला सुबुद्धी देण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) शेतकरी संघटनेच्या वतीने सोनपेठ तालुक्यात विविध ठिकाणी रोहित्राजवळ बसून आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.
रब्बी हंगामातील शेतातील उभ्या पिकांना पाण्याची गरज असताना कृषिपंपाची वीज तोडली जात आहे. राज्य सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ सोनपेठ तालुक्यात शेतकरी संघटनेचे नेते गणेश पाटील यांनी सरकार व वीज वितरण कंपनी यांना सुबुद्धी येवो, यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसून आत्मक्लेष आंदोलन केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) समोर उभे राहून आत्मक्लेष करीत आंदोलन केले.
या आंदोलनात माऊली जोगदंड, अण्णा जोगदंड, विश्वंभर गोरवे, सोमनाथ नागुरे, देविदास भुजबळ, गणेश पतंगे आदी शेतकरी सहभागी झाले होते.